कणकवली / प्रतिनिधी :
महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय ज्योतीका हरयाण यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
महाराष्ट्र पोलीस म्हणजे महाराष्ट्रातील सर्व महिलांचा भक्कम आधार! या भक्कम आधाराच्या जोरावरच आजची स्त्री बिनधास्तपणे समाजात वावरत आहे.त्यामुळे आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपले रक्षक असणाऱ्या कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हवालदार दाजी सावंत, पोलीस नाईक रुपेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, आदी पोलीस बांधवांना जिल्हा सचिव सुप्रिया पाटील ,सदस्य संगीता पाटील, स्वरदा खांडेकर, सई पाटील यांनी राखी बांधून रक्षाबंधन सणाचे महत्व जपले,
अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून, परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात, रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते, आपल्या विभागात कार्यरत हे पोलीस बांधव समाजातील बहिणींच्या संरक्षणासाठी कर्तव्य तत्पर असतात याची जाणीव महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीका हरयाण यांनी ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह विभागातील पोलीस जवानांना राखी बांधून या सणाचे महत्त्व जपले.