You are currently viewing बंध रेशमाचा …

बंध रेशमाचा …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बंध रेशमाचा …*

राखी पुनव ती आली श्रावणाच्या महिन्यात
बंध रेशमाचा आहे त्याचे गोडवे ती गात
नाते बहिण भावाचे मऊ लोण्याहून मऊ
जीवापाड प्रेमकरे बहिणीवर तो भाऊ..

बालपण ते आठवे खेळ लहानपणीचे
खोटे खोटे ते लढणे भांडण ते गमतीचे
एका ताटातले खाणे एकमेका भरवणे
किती छानच होते हो बालपणीचे ते जीणे..

जाते सासरी बहिण मागे वळून पाहते
देवाकडे औक्ष भावासाठी ती मागते
सुखी ठेव भाऊराया मला अन्य नको काही
भावा साठीच मागते नेहमीच ती दुवा ही…

जाते अधून मधून गोड करण्यास सण
दोन दिसात हो तिचे नाही भरतच मन
पण संसार पाठीशी नाही सोडवत गाठ
मग सोडून जाते ती माहेरात तिची पाठ …

निमिनिमित्ताने असे येती उजळून बंध
भेटी छोट्याशाच पण दरवळतो सुगंध
श्रावणातले हे सण मोठे असती गोडीचे
मोती पाचू आणि सोने अमृताच्याच तोडीचे….

प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)
दि : २९ ॲागष्ट २०२३
वेळ: रात्री ९/१५

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा