You are currently viewing गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची सरकारची नौटंकी- इर्शाद शेख

गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची सरकारची नौटंकी- इर्शाद शेख

*गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची सरकारची नौटंकी- इर्शाद शेख*

सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपये कमी करण्याची घोषणा केली आहे. महागाईमुळे केंद्र व राज्य सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता निवडणूका जवळ आल्यामुळे आपण कसा जनतेचा विचार करतो हे दाखवण्यासाठी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचे नाटक सरकार करत आहे यांना जनतेच्या सुख दुःखाशी काही देणे घेणे नाही यांना फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत. एप्रिल 2021 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 379 रुपये वाढ करण्यात आली आहे आणि आता फक्त 200 रुपये कमी करून जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा 2014 ला मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा घरगती गॅस सिलेंडरचा दर 410 रुपये होता तो आता किती आहे हे जनता जाणते. हे सरकार फक्त निवडणूकजीवी आहे यांना फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत जनतेला या सरकारचे अप्रत्यक्ष म्हणणे हेच आहे की तुम्ही आम्हाला पुनः सत्ता द्या आम्ही पुन्हा पुढच्या निवडणूका येई पर्यंत तुम्हाला लुटून तुमचे जगणे मुश्किल करू आणि पुन्हा पुढची निवडणूक आली की पुन्हा अशीच नौटंकी करू. पण जनतेला हे सर्व कळून चुकले आहे हे सरकार सर्वसामान्यांचे नाही तर हे सरकार मूठभर उद्योगपती मित्रांचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर गेल्या एक दिड वर्षापासून मोठ्याप्रमाणात कमी झाले आहेत त्यातच युक्रेन युद्धामुळे भारताला रशियाकडून स्वस्त दरात क्रूड ऑईलचा पुरवठा होत आहे तरी सुद्धा मोदी सरकार पेट्रोल व डिझेलवर एक रुपया कमी करायला तयार नाही यावरून सर्वसामान्य जनतेप्रती हे सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येते. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने जनतेची फक्त आणि फक्त लूट केली आहे या सरकारला येत्या निवडणुकीतच नाही तर आता सुद्धा सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी खरमरीत टीका सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा