You are currently viewing असलदे ग्रा.पं.१५ वित्त आयोगातून बचत गटांना घरघंटी, शिलाई मशिन वाटप

असलदे ग्रा.पं.१५ वित्त आयोगातून बचत गटांना घरघंटी, शिलाई मशिन वाटप

असलदे ग्रा.पं.१५ वित्त आयोगातून बचत गटांना घरघंटी, शिलाई मशिन वाटप

कणकवली
असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन महिला बचत गटांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे. या महिलांनी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत.महिला बचतगटांनी महिलांना सक्षम होतील या दृष्टीने काम करावे,असे आवाहन असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केले.

असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगातून दोन बचत गटांना घरघंटी व शिलाई वाटप तसेच नागरिकांना डस्टबिन वाटप सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच सचिन परब, सोसायटी चेअरमन भगवान लोके, ग्रामपंचायत सदस्य दयानंद हडकर तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,
संचालक उदय परब, परशुराम परब,गणपत शिंदे, अनिल नरे, संचालक विठ्ठल खरात, प्रवीण डगरे,ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी मधुसूदन परब,प्रकाश वाळके,सत्यवान घाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा