देवगड
राज्यातील ग्रामसेवक २६ नोव्हेंबरला एक दिवसीय संपावर जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवक या संपात सहभागी होणार असून हा संप यशस्वी केला जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाच्या दफ्तरी प्रलंबित आहेत त्या जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करणे, प्रवास भत्ता, शैक्षणिक अहर्ता बदल, अतिरिक्त कामे कमी करणे, जिल्हा परिषद ग्रामसेवक व इतर कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेची घेतलेली घातलेली अट रद्द करणे, खाजगीकरण कर्मचारी धोरणे रद्द करून सध्याच्या अंशकालीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा आऊटसोर्सिंग पद्धतीने भरण्याचे शासन निर्णय रद्द करून त्यांची सेवा नियमित सुरू करा मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा, श्रमिक कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय ठरणारे सर्व भत्ते सर्व कर्मचाऱ्यांना मंजूर करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा व ही पदे भरताना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या विनाअट करा व अशा अनेक मागण्यासाठी हा पुकारला आहे.