अंबरनाथ :
प्रकाशन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रोहिणी प्रकाशनचे, “गुंफण” कथासंग्रह व “भाव स्पंदन” काव्यसंग्रहाचे रविवार दि. २७ आँगस्ट रोजी केळकर सभागृह, अंबरनाथ येथे विविध क्षेत्रातील दिग्दज मान्यवरांच्या हस्ते धुम-धडक्यात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सदर कथासंग्रह ‘लेखन अन् मी’ साहित्य समूह प्रस्तुत तथा किणीकर प्रतिष्ठाण यांच्या सहयोगाने अंबरनाथ नगरीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व तद्नंतर मान्यवरांच्या सत्कार समारंभाने करण्यात आली. यावेळी ‘गुंफण’ प्रातिनिधिक संग्रह तर, ‘लेखन अन् मी’ समूहाचे संस्थापक मा.रमेश पाटील लिखित ‘ जीवनाचे भान सांगणारा ‘भावस्पंदन’ कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला. दरम्यांन दुसऱ्या सत्रात सुग्रास भोजना नंतर निमंत्रितांच्या कविसंमेलनास सुरुवात झाली. महाराष्ट्रातून विविध जिल्यातील नामांकित तब्लल तिस पेक्षा जास्त कविंनी आपापल्या शैलीत सभागृह दणाणून सोडले. ठाणे येथील प्रसिद्ध कवियत्री प्रमिला शिंदे यांची ‘बाप’ कविता मनाला चटका लाउन गेली तर, ‘माय मराठी विसरुन लोक हाय- फाय झाली’ ही कवयित्री नाजमीन असलम मुलाणी यांनी सुरेल आवाजाने श्रोत्याचे मंन जिंकत आपले पहिले युट्यब गाणे प्रसिद्ध केले.
‘गुंफण’ कथा संग्रहात मा.रमेश पाटील, जेष्ट साहित्यिक मा.अरुण वि.देशपांडे सर, बबनराव वि.आराख, श्रीशैल्य सतार, संजय जाधव, शाहीर मनोहर पवार चिखली, यांच्या सह महाराष्ट्रातील तब्बल १९ नामांकित लेखकांच्या कथा समाविष्ट असूंन, संग्रह वाचकास भावेल असाच आहे. दरम्यान, कवी संजय जाधव ‘ति सतावते’ श्रीशैल्य सुतार यांची, ‘पाहुणं मुक्काम करुन जावा’ लावणी कार्यक्रमाची आकर्षण ठरली. श्रीशैल्य सुतार व वनिता धनवटे अप्रतिम संचलन केले.
अद्विय अशा या सोहळ्यास सिनेअभिनेत्री राजेश्री काळे, जेष्ट लेखक मा.अरुण वि.देशपांडे, आमदार डाँ. मा.बालाजी किणीकर, प्रमुख पाहूणे प्रा. बाळासाहेब तोरस्कर, कविसंमेलनाध्यक्ष मा. विजय जोशी सर, व्यासपिठ मान्यवर बहुसंख्य साहित्यिक- श्रोते तसेस अंबरनाथ कर आणि उपनगरातील साहित्य प्रेमी यांची लक्षनिय उपस्थिती होती. यामुळे प्रकाशन सोहळा संस्मरणिय ठरला. संस्थापक मा.रमेश पाटील ‘लेखन अन् मी’ साहीत्य समूह समुह ॲडमीन बबनराव वि.आराख जि.बुलढाणा, यांनी आपल्या ‘गुफण ‘ कथे विषयी थोडक्यात मत व्यक्त केले.
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*