ओम श्री शिवसाई मित्रमंडळ फोंडाघाटच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा..
कणकवली
ओम श्री शिवसाई मित्रमंडळ फोंडाघाट आयोजित राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेमध्ये पंचक्रोशी फोंडाघाट विरुद्ध लक्ष्मी नारायण वालावल यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अवघ्या तीन गुणांनी लक्ष्मीनारायण वालावल संघावर मात करत फोंडाघाट पंचक्रोशी संघाने कै. सुदन बांदिवडेकर चषकावर आपले नाव कोरले.
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट च्या मैदानावर दोन दिवस चाललेल्या ओम श्री शिवसाई मित्रमंडळ फोंडाघाट आयोजित कै. सुदन बांदिवडेकर चषक राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेमध्ये राज्यातील मातब्बर संघानी सहभाग घेतला होता यामध्ये शाहू सडोली कोल्हापूर संघ, विजय प्रतिष्ठान सावंतवाडी,जय गणेश वैभववाडी,ज्योतिर्लिग आवळी, संघर्ष कोचरा मालवण,जय महाराष्ट्र सावंतवाडी,युवा आणाजे कोल्हापूर,शुभम स्पोर्ट्स देवगड ,लक्ष्मी नारायण वालावल, जय हनुमान बाचणी कोल्हापूर, शिवमुद्रा कौलव कोहापूर , गुढीपूर पिंगुळी कुडाळ ,यंगस्टार कणकवली ,पंचक्रोशी फोंडाघाट, गुडाळेश्वर कोल्हापूर ,कर्जा देवी रत्नागिरी , संघर्ष फोंडाघाट ,सिंधुपुत्र कोळोशी, रियांश स्पोर्ट्स तोंडावली,गडगेसखल फोंडाघाट, आदी मातब्बर अशा 32 संघानी सहभाग घेतला होता. दरम्यान या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी मार्टिन अल्मेडा (निरीक्षक),नितीन कदम (पंच प्रमुख), राजेंद्र जाधव ,महेश गुरव,संतोष गोसावी,दत्तात्रय गायकवाड,शिवाजी मगदूम,दिलीप चव्हाण व अमित गंगावणे या राज्यस्तरीय पंचांनी पंचाचे काम पाहिले.
अंतिम सामन्यात फोंडाघाट पंचक्रोशी संघात व लक्ष्मी नारायण वालावल संघात अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मध्यंतरानंतर लक्ष्मी नारायण वालावल संघाने कमबॅक करत उत्कृष्ठ पकड,उत्कृष्ठ चढाई चे प्रदर्शन करत फोंडाघाट पंचक्रोशी संघाला नमोहरण केले मात्र सुरुवाती पासून पंचक्रोशी फोंडाघाट संघाच्या अमित चव्हाण याच्या अष्टपैलू खेळाच्या आणी अक्षय पाटील याच्या दर्जेदार चढाई व सांघिक पकडीच्या जोरावर गुण फलकावर आघाडीवर असलेला फोंडाघाट पंचक्रोशी संघ 15 गुण आणि लक्ष्मी नारायण वालावल संघ 12 गुण अशा 3 गुण फरकाने फोंडाघाट पंचक्रोशी संघ विजेता ठरला.विजेत्या संघास आकर्षक चषक आणि रोख रक्कम बक्षीस स्वरूपात शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले
दरम्यान या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला लक्ष्मीनारायण वालावल संघास रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धे मध्ये तृतीय क्रमांक मिळालेला शिवराई कोल्हापूर चतुर्थ क्रमांक मिळालेला शाहू सडोली कोल्हापूर या दोन्ही संघास चषक आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ठ चढाईपट्टू म्हणून पंचक्रोशी फोंडाघाट संघाच्या अक्षय पाटील व अष्टपैलू खेळाडू म्हणून अमित चव्हाण याला गौरविण्यात आले तर उत्कृष्ट पकड्डपटू लक्ष्मी नारायण वालावल संघाच्या गुरु पाटकर याचा तर उगवता तारा म्हणून योगेश घाडी याला गौरविण्यात आले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओम श्री शिवसाई मित्रमंडळाच्या दीपक इसवलकर,महेश भोगले, विशाल पारकर,भूपेश राणे, संजय चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.