You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी

भुताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

*भुताखेतांच्या गोष्टी*
(क्रमांक ८ वा ).
———————-
सातव्या कथेनंतर अनेकांनी अनेक प्रश्न विचारले ..खरे तर स्वानुभुती महत्वाची असते …आणी जगात , सृष्टित घडणाऱ्या , किंवा असणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्याला माहिती नसतात ..पण काही गोष्टी जरी आपण प्रत्यक्ष पाहिल्या नसल्या तरी त्यावर विश्वास ठेवावा लागतो …ज्या अनिष्ट गोष्टी आहेत , त्या करु नयेत . जिथे त्रास होतो अशा ठिकाणी कुणी जावू नका सांगीतले तर जावू नये .अशा अनेक गोष्टी अनेक घटना जगात घडत असतात ..आपली विविक बुद्धी , विचार वापरून आपण निर्णय घ्यावेत ..अशी परंपरा सांगते …सृष्टित अतृप्त आत्मे ( भूतपिशाच्च्य योनी ) आहे किंवा नाही हे सांगून ,ऐकून नाही तर स्वानुभवांती कळते ….पूर्वी वस्ती ,लोकसंख्या कमी होती , त्यामुळे निर्जनता जास्त , विपुल होती . हल्ली स्मशाना जवळ देखील मोठ्ठे मोठ्ठे कॉम्लेक्स उभे राहिलेत …मग तिथेही लोक रहातातच की ! तिथे भूतबाधा होत नाही कां ? तिथे भूते नाहीत कां ? असेही प्रश्न येतात … याचे उत्तर तिथे रहाणारी माणसेच देतील .. मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये तर शवाघरात तर स्मशानातही झोपणारी माणसे आजही आहेत आपण पहातो. मी पाहिली आहेत . तर याला काय म्हणावे ? याला माझे उत्तर एवढेच की ही भूतपिशाच्च्य योनी सर्वानाच त्रास देत नसावी ..(माझा कारखानाच एका अतृप्त आत्म्याच्या जागेत होता सुमारे ३५ वर्षे ,मला काही त्रास झाला नाही ) हा स्वानुभव आहे ..
किरवंत म्हणजे मनुष्य प्रेतावर अंतिम अग्निसंस्कार विधि करणारी व्यक्ती , तीला तर केव्हाही स्मशानात जावे लागते ..तो त्यांचा व्यवसाय आहे . पण अशा ठिकाणी आपल्याला प्रसन्नता जाणवत नाही , हे खरे आणी आपण कुणीच ते नाकारु शकत नाही . चला आज आपण स्मशानात ( स्मशानातील बागेत ) फिरायला ,पिकनिकला जावू असे कधी म्हणत नाही , ही एक सर्वांचीच मानसिकता झाली आहे . हे काही खोटे नाही ..याचाच अर्थ अमंगळ वाटते ..म्हणजेच तिथे मनाला मंगलता ,प्रसन्नता नसते . हेही सत्य आहे ..याचाच अर्थ त्या वातावरणात ,…अदृश्य अशी अतृप्त शक्ती आहे हे निश्चित ..
एक प्रसंग मी अनुभवलेला पुण्याच्या आसपास एक मोठ्ठी जागा आहे , ती एकाने कॉम्लेक्स बांधण्यासाठी घेतली होती . पण तो अनेक वर्षे प्रयत्न करून देखील बांधू शकला नाही .शेवटी कंटाळून ती जागाही त्याने विक्रीस काढली , ती विकली देखील गेली नाही .. बाजारभावा पेक्षा खुप कमी म्हणजे खरेदी किमतीच्या २५% भावाने देखील तो विकु शकला नाही ही वस्तुस्थिति १२ ते १५ वर्ष्यापूर्वीची आहे …ही गोष्ट माझ्या कानावर आली होती , त्या व्यक्तीशी माझा संपर्क आला , मी म्हटले पाहुया तरी हा काय प्रकार आहे ..एवढ्या कमी किमतीत जर जागा मिळत असेल तर बघुया तरी म्हणून मी माझ्या काही मित्रा सोबत मुद्दाम जागा बघून आलो ..आणी त्या बिल्डरला सांगीतले पुढील आठवड्यात तुम्हाला मी निर्णय सांगतो … मुळातच जागा प्रथम दर्शनी पहाताच मला अस्वस्थता जाणवली होतीे. पण इतक्या कमी दरात जर जागा मिळत असेल तर किमान काहीतरी गुंतवणूक होईल पुढे त्यातून अर्थार्जन देखील होईल असा मनात विचार देखील आला. …….
मी पुन्हा त्या जागेकड़े गेलो , आणी त्या गावातील ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांना भेटलो , सर्व गावात चौकशी केली तेंव्हा असे कळले की ब्रिटिशकाळा मद्धये त्या परिसरात लहान मुलांना मेल्यानंतर पुरण्यासाठी व त्याच्याच पलीकडे निम्या जागेत ख्रीस्ती लोकांची दफनभूमी होती …आणि रात्री अपरात्री तेथे लहान मुलांच्या रडण्याचाही आवाज येतो . असे गावकरी म्हणाले .
तिकडे कुणी फिरकत ही नाही .
बरीच वर्षे ही जागा केवळ या कारणामुळे पडून आहे….
हा त्या जागेचा दोष असून त्या जागेमध्ये स्मशान असून तिथे अतृप्त आत्मे वावरत आहेत असे कळले…. त्यानंतर ती जागा खरेदी करण्याचा विचार मनातून काढून टाकला. पण मनात इतकी स्वस्त जागा मिळत असूनही मी खरेदी करू शकलो नाही ही खंत राहीली . पुढे ती जागा विकली गेली नाही . आज त्या जागेवर धरणाचा मोठा पाणलोट आहे..सत्य कथा ! …..(संक्षिप्त)

*©विगसा*

🙏🙏🙏🙏🙏

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा