*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*
*भुताखेतांच्या गोष्टी*
(क्रमांक ७ वा)
सध्या मी पाहतो आहे , माझे विविध विषयावरचे लेखन या माध्यमातून प्रसिद्ध होते ,पण या भूतांखेतांच्या गोष्टी लोकांना खुप आवडत आहेत . ते खरे आहे ५० /६० वर्षापूर्वीचे वातावरण खुपच वेगळे होते ..रस्ते अरुंद ,दगड़ामातींचे ,रस्त्यावर लाईट नाही , खांबावर काही ठिकाणी रात्री रॉकेलच्या बत्त्या लावित असत .तिन्हीसांज झाली की सगळीकड़े सामसुम असे ..गावातली काही मंडळी पारावार किंवा पडवीत गप्पा मारीत बसत ..घरातही कुणी पाहुणे मंडळी आली की रात्री आवर्जून गप्पाना उधाण येत असे ,अगदी मोकळ्या ढोकळ्या गप्पा होत असत . विषयाला बंधन नसे ..पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती .अशा गप्पाच्या वेळी सगळे लहान थोर एकत्र बसलेले असत . बहुतेक भूतपिशाच्च्यांच्या गोष्टीना उधाण येत असे …भीतिने गाळण उड़त असे …
अशा अनेक गोष्टी मी ऐकल्या आहेत …त्यापैकी एक……
अरे त्या समोरच्या बोळातून तो अमुक अमुक रोज रात्री 12 वाजुन गेले की लेंगाशर्ट घातलेला माणुस रस्त्यापर्यन्त चालत येतो , समोरच्या घराच्या पायरीवर बसतो . बिड्यांचे पाकिट काढतो अन ओढ़त बसतो , बिड्या संपल्या की , रामाच्या मंदिरा जवळ जे तिकाटणे आहे तेथील मुतारीत जातो .आणी तिथुन मोठ्या मोठ्या ढांगा टाकत परत त्याच घराच्या पायरीजवळ येवून बसतो ..अन जरका कुणी त्या बोळात आले तर त्याला झपाटतो ..कधी एकदम मोठा होतो , शेजारच्या नारळाच्या झाडाला लोंबकाळतो. रस्त्यावर लोळतो , उड्या मारतो , विक्षिप्त चाळे करतो . रोज रात्री समोरच्या हौदावर आंघोळ करतो हौद मोकळा करतो , वगैरे..हे ऐकल्या नंतर उत्सुकते पोटी मी कित्येक दिवस आमच्या घराच्या खिड़किच्या फटीतून रात्री ते भूत मला दिसते कां ते पहाण्याचा प्रयत्न केला पण ते पिशाच्च्य मला कधी दिसले नाही …पण तिथे त्या बोळात कुणीही जात नसे ..तिथे पिराचे थडगे दिसत होते ..रस्त्यावरुन येणारी जाणारी माणसे त्या बोळाकड़े पाहुन नमस्कार करीत असत .अमावस्या पौर्णिमेला तिथे बोळात ठराविक ठीकाणी काही लोक शिधा , हळदकुंकू , गुलाल , कधी कोंबड़ी वगैरे ठेवित असत हे मात्र आठवते ..अजुनही तो बोळ आहे तसाच आहे ..थोड्याफार प्रमाणात अमावास्या पौर्णिमेला ते प्रकार चालू आहेत असे कळते ….महत्वाची खटकणारी गोष्ट म्हणजे की , ती व्यक्ती (पिशाच्य) ज्या घरात रहात होती ते घर मुख्य वस्तीत 50 / 60 वर्षे झाली तरीही आजही पडक्या अवस्थेत आहे ..तिथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम झाले नाही यावरूनच त्या गोष्टित काहीतरी तथ्य असावेे असे लक्षात येते ..; *(सत्य घटना)*
*©विगसा*
👍👍👍👍👍
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*