सावंतवाडीत महाआरोग्य शिबिराचे 03 सप्टेंबर रोजी आयोजन
शिबिराचा लाभ घेण्याचे
सावंतवाडी
रविवार दिनांक 03 सप्टेंबर 2023 महाआरोग्य शिबिर सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर पाठीमागे श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स स्नेहदीप हॉटेल शेजारी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तसेच कोल्हापूर अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोफत महाआरोग्य शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयोजित केले असून सदरील महाआरोग्य शिबिराचा लाभ रुग्णांनी घेण्यात यावा
त्यासाठी पिवळे केसरी अंत्योदय व अन्नपूर्णा रेशनिंग कार्ड तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे येताना सर्व प्रकारचे आरोग्य तपासणी रिपोर्ट तपासणीच्या वेळी घेऊन येण्यात यावे
*सकाळी 12 ते 04 वाजेपर्यंत हे महाआरोग्य शिबिर होणार आहे तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णांना मोफत बस सेवा शस्त्रक्रिया करण्यासाठी सावंतवाडी ते कोल्हापूर येथे आयोजीत करण्यात आले आहे रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण याचा सुध्दा मोफत लाभ रुग्णांना मिळणार आहे
याचा लाभ सिंधुदुर्गवासीयांनी व सावंतवाडी तालुक्यातील रुग्णांनी मोफत लाभ घेण्यात यावा नोंदणीसाठी संपर्क ९४२२४३५७६० – राजु मसुरकर सकाळी अकरा ते एक व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत नोंदणी करण्यात यावी*
संमतीपत्र अथायू (ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी)
हॉस्पिटल,कोल्हापूर माझे नाव वय पत्ता खालीलप्रमाणे मी लिहून देतो कि मोफत आरोग्य शिबिरामध्ये मी सहभाग घेतला
१. पुढील उपचारासाठी मला हॉस्पिटलकडून बससेवा उपलब्ध झाली*.
*२. ऑपरेशन आधीच्या तपासणीसाठी मला ३५०० रुपये खर्च येणार आहे आणि मी तो खर्च करण्यासाठी तयार आहे*.
*३. शिबिरामध्ये मोफत अँजिओग्राफी असून जर अँजिओप्लास्टी किंवा बायपास निघाले तर पुढील उपचार मी अथायू हॉस्पिटल मध्येच लगेच घेणार आहे*.
*४. जर पुढील उपचार पेशंट स्वतःहून नाकारत असेल तर त्यांना हॉस्पिटलचा अँजिओग्राफीसाठीचा खर्च ८५०० रुपये भरावे लागतील*.
*५. हॉस्पिटलकडून पेशंटला जेवणाची मोफत सोय आहे*.
*६. पेशंटसोबत एका नातेवाईकास राहण्याची मुभा आहे*.
*७. ऑपरेशन आधी जर MRI, CT Scan किंवा Echo ( इको) व विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्याची गरज असेल तर तो रुग्णांना स्वखर्चाने करावा लागेल*.
*८. जे संमतीपत्र देऊन शिबिरात सहभागी होण्यास तयार असतील त्यांनाच शिबिरामध्ये सहभाग देण्यात येईल*.
*पेशंटचे नाव*
*मोबाईल नं*
*पत्ता*
*सही*
*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय क प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*सावंतवाडी उभाबाजार*
*मोबा. ९४२३४३५७६०*
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️