सायकलिंग क्रीडा स्पर्धेचा निकाल
सिंधुदुर्गनगरी
जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलीमध्ये कृतीका देवेंद्र लोहार तर 17 वर्षाखालील मुलीमध्ये तृप्ती दळवी प्रथम आल्या असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, कनिष्ठ लिपीक पंढरीनाथ चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगांवकर, संघटना प्रतिनीधी बापु परब हे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये टोपीवाला हायस्कुल मालवण डॉन बॉस्को हायस्कुल ओरोस, बॅ.नाथ पै हायस्कुल कुडाळ, न्यु.इंग्लिश स्कुल ओरोस, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण, वराडकर हायस्कुल कट्टा, कुडाळ हायस्कुल कुडाळ, न्यु. इंग्लिश स्कुल पेंडुर या शाळांमधुन एकूण 26 खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
14 वर्षाखालील मुली, प्रथम- कृतीका देवेंद्र लोहार, व्दितीय -श्रावणी प्रशांत इब्रामपुरकर
14 वर्षाखालील मुले, प्रथम- श्राव्य एन झांटये, व्दितीय- सोहम नंदिकिशोर पाडगांवर
तृतीय – श्लोक मनीष मांजरेकर.
17 वर्षाखालील मुली, प्रथम – तृप्ती दळवी, व्दितीय- निधी सरमळकर, तृतीय- वैष्णवी पोर्टे.
17 वर्षाखालील मुले, प्रथम- सोहम लाड, व्दितीय- आदित्य शिंदे, तृतीय -प्रथमेश परब.
19 वर्षाखालील मुले, प्रथम- सिध्दार्थ केळुसकर, व्दितीय- मानस नाईक, तृतीय- सर्वेश कुंभार, प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व तांत्रिक अधिकारी प्रथमेश सावंत, रुपेश तेली, डॉ. सिध्दार्थ परब, शिवप्रसाद राणे, सिध्दाली वारंग, भुषण तेजम, नंदन साईल व निलेश झाटये यांचे सहकार्याने स्पर्धा संपन्न झाली. क्रीडा व युवक सेवा संचालयनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धा आज ओरोस येथे यशस्वीरीत्या पार पडल्या.