*कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार*
*आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश*
*कुडाळ आगारात आज एक स्लीपर एसटी होणार दाखल*
कुडाळ व मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती.त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने व सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ व मालवण आगारासाठी नवीन एसटी गाड्या देण्याची मागणी केली होती.ही मागणी मान्य करत कुडाळ आगारासाठी ६ स्लीपर व ४ साध्या अशा एकूण १० नवीन एसटी गाड्या आणि मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या देण्याचे शेखर चन्ने यांनी मान्य केले होते. यातील १ स्लीपर गाडी आज कुडाळ आगारात दाखल होणार आहे. अन्य गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.