*पोलिस निरीक्षक मुल्ला यांनीही अधिकाऱ्यांना सुनावले*
कुडाळ :
कुडाळ तिवरवाडी व कुसगाव या गाड्या ऐनवेळी रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सदर घटनेची माहिती गिरगाव बूथ अध्यक्ष सुशील तांबे यांनी तालुकाध्यक्ष दादा साईल यांना दिल्याने याची तात्काळ दखल घेत दादा साईल यांनी संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, निलेश तेंडुलकर, किशोर मर्गज, संध्या तेरसे, अविनाश पराडकर, उदय घोगळे, श्रावण शिरसाट, सुनील बांदेकर, बंड्या कनदुरकर यांच्यासह प्रवाशांना घेऊन आगारात धाव घेत आगाराला घेराव घातला. अधिकारी येत नाहीत तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर अधिकारी तब्बल १० वा. आगारात पोचले. चर्चेअंती पुन्हा असे प्रकार होणार नाहीत अशी प्रवाशांना अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे पणदूर हायस्कूल येथे आणि हिर्लोक हायस्कूल येथे रात्री ८.३० वाजेपर्यंत खोळंबलेल्या विद्यार्थ्यांच्या जाण्याची मोफत व्यवस्था स्थानिक कार्यकर्ते सूर्यकांत नाईक आणि धोंडी सुर्वे यांच्या मार्फत करून दिली.
कुडाळ आगारातून गाड्या सोडल्या नसल्याकारणाने भाजपचे दादा साईल, निलेश तेंडुलकर, बंड्या सावंत, संध्या तेरसे यांनी आक्रमक होत वस्तुस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली रात्रौ ८.३० वाजता मार्गावरील प्रवासी व विद्यार्थि याची भाजप मंडळ अध्यक्ष दादा साईल यांनी प्रवासाची मोफत सोय केली. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.