ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाधिकारी आदरणीय किशोर तावडे यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती जिल्ह्यात विविध समजभिमुख कार्य करत असून महिलांसाठी विविध प्रश्नांबाबत आवाज उठवत असते.
नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या पूर्वी प्रशासकीय सेवा ही लोकाभिमुख केली असल्याने एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांची सेवा चांगली राहील या साठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती दीपा ताटे यांनी दिली.
यावेळी महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष आदरणीय दीपा ताटे मॅडम, सचिव तन्वी सावंत, सदस्या सौ सुस्मिता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.