You are currently viewing जेष्ठ नागरिक दिवस

जेष्ठ नागरिक दिवस

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे, समूहाचे ज्येष्ठ सदस्य लेखक श्री.अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*जेष्ठ नागरिक दिवस*

 

– *✍️अनिल देशपांडे*

 

आज २१ॲागस्ट म्हणजेच “जेष्ठ नागरिक दिन “खरं तर जेष्ठ नागरिकांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे . त्यातुन पुणे , नाशिक , कोल्हापूर , नागपूर या शहरांमधे रिटायर्ड लोक दिवसेंदिवस स्थायीक होण्याचे प्रमाणही वाढत आहे . एका दृष्टीने ते योग्यही आहे कारण नोकरीच्या निमित्ताने आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जात /रहात असतो , त्यामुळे जेष्ठत्व आल्यावर एखाद्या शहरात कुटुंबासह स्थायीक होणे आपल्या अधिक सोयीचेच असते !

त्यातुन काही कुटुंबात आपण ,जेष्ठ लोकांची हेळसांड होतांना ही पहात असतो , खरंच वाईट वाटतं पण प्रत्येक कुटुंबाची जडण घडण इतकी वेगवेगळी असते की आपण त्यात काही हस्तक्षेप पण करू शकत नसतो .

आपल्याकडे चाळीशी आली की दूरदृष्टी येते असा समज आहे व त्याची खूण चष्मा लागतो हीच असावी ! पण चष्मा व बौध्दिकता यांचा काही एक संबंध असावा असे मला तरी वाटत नाही !

पण एखादी व्यक्ती ची “साठी “वगैरे आलीकी घरातल्या लोकांना आनंद व अप्रुप वाटत असे . आणि साहजिकच आहे काही वर्षांपुर्वी आपले जीवनमान ५०च्या आसपास असे !

त्यामुळे साठी गाठलीकी शांत करणे वा ८० वर्ष पुर्ण केले की “सहस्त्रचंद्रदर्शन “दर्शन अशा सारखा सोहळा साजरा करत असत . आताही हौस म्हणून करणारेही आहेतच की !आणि त्यावेळी ते अप्रुप असणे साहजिकच आहे . ज्येष्ठ होणे हा एका अर्थाने आपण नव्याने ‘बालवयात’ प्रवेश केला, असे मानतो. कुटुंबात आपल्याला एक वेगळे स्टेटस मिळते व अनेक बाबतीत विशेष सवलतही. या बालवयातील प्रवेशामुळे अनेक प्रश्नही निर्माण होतात. आपल्या अनुभवाचे बोल गरज व कारण नसतानाही देण्याचा आपला अधिकार सर्वांनी मान्य केला पाहिजे असा बालहट्ट असतो. आधी सारे त्याकडे खरोखर बालहट्ट म्हणून बघतात व त्यानुसार रिस्पॉन्स ही देतात. हळुहळू याचा अतिरेक होतो, तेव्हा दुर्लक्ष करा असे म्हणतात. नंतर याचे रूपांतर खटक्यात होते. नंतर ते कायम भांडणाचे व ताणलेल्या संबंधांचे रूप धारण करत असते .

कुटुंबातील मुलाकडे अथवा मुलीकडे अपत्य येते, त्यावेळी ज्येष्ठांची आठवण हमखास येते. ती देशात असो की परदेशात. हक्काचे माणूस म्हणून तेव्हा योग्य आदर राखत हा व्यवहार पार पाडला जातो. ज्येष्ठ मंडळी याकडे आनंद, कर्तव्य या दोन्ही भूमिकांमधून बघतात. समाजात वाढत्या महागाईने नवरा व बायको अशा दोघांनाही नोकरी करावी लागते. या काळात मुली-मुलांकडे लक्ष देण्यासाठी हक्काचे माणूस म्हणून ज्येष्ठांची गरज असते. यात काही गैर नाही. देशातील आरोग्यव्यवस्था कितीही वाईट असली तरी जगभर जे संशोधन झाले व सुरू आहे, त्यामुळे मानवाचे आयुर्मान वाढले आहे हे निश्चीत .आत्ता या वाढलेल्या ज्येष्ठ मंडळींचा समाजाला काय उपयोग? असा स्वार्थी विचार काही ठिकाणी मूळ धरतो आहे. ते एक कुटुंब व समाजावरचे ओझे आहे, असे ही काही ठिकाणी उघड बोलले जाते. हे बोलताना आपण आजच्या ज्येष्ठ मंडळींपेक्षा नक्कीच जास्त जगण्याची शक्यता आहे, याचा मात्र साऱ्यांना सोयीने विसर पडतो.

या पार्श्वभूमीवर आज समाजात वृद्धाश्रम तसेच आधारगृहांची संख्या वाढते आहे. यातल्या बहुतेक चालकांचा अनुभव फार उत्साहवर्धक नाही. अनेकदा घरातील अडगळ सांभाळायला दिली आणि त्याचे पैसे मोजले की कर्तव्य संपले, असे मानून ज्येष्ठांना यात टाकले जाते. त्यांना घरी सांभाळणे, ही अनेक कारणांनी असलेली व्यवहारिक समस्या सोडविली पाहिजे असे मला वाटत असते .पण वृद्धाश्रम ही आधुनिक जगातील सोय आहे. तिला डम्पिंग ग्राउंड मानले जाऊ नये एवढेच ! खरं तर ग्रामीण भागात याहीपेक्षा वाईट अवस्था आहे हे ही निश्चीत !

या जेष्ठांच्या ऊर्जेचा वापर घरोघरी व्हायला पाहिजे असे मनोमन वाटत असते .

अनेक जेष्ठ उच्चशिक्षीत व अनुभवी असतात त्यांचा योग्य तो ऊपयोग देशाने , समाजाने करून घ्यावा हे खरंच वारंवार वाटत असतं .

उदासीनता झटकून ज्येष्ठांनी आपली ऊर्जा समाजाला द्यावी व समाजानेही ती आनंदाने व कृतज्ञतेने घ्यावी असेच आजच्या दिना निमित्त वाटत असते एवढेच !

***********************

श्री.अनिल देशपांडे

पुणे ,

२१ॲागस्ट २०२३

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा