You are currently viewing मडगाव जनशताब्दी एवसप्रेस गाडीच्या बसण्याच्या जागेवरून यातनामय प्रवास !

मडगाव जनशताब्दी एवसप्रेस गाडीच्या बसण्याच्या जागेवरून यातनामय प्रवास !

मुंबई:

 

कोकण रेल्वे सुरू झाली आणि कोकणी माणूस खरं तर सुखावला असे वाटते होते. पण यातना सहन केल्या खेरीज त्याचा प्रवास आजवर झाला नाही. हेच करतं त्यांनी मुंबई ते आपल्या गावापर्यंत प्रवास सुखकर व्हावा यासाठी झटत राहिला. मग वडाची साल पिंपळाला आणि पिंपळाची साल वडाला करीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या गावात जाण्यासाठी एसटी वर अवलंबून असतानाच दरम्यानच्या काळात सन्माननीय श्री. मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे सुरू झाली. थोड्या फार प्रमाणात कोकणी माणसाला दिलासा मिळाला. असे वाटत असतानाच रेल्वेच्या डब्यात उणीवा ठेवण्यात येत असल्याने कोकणी माणसाचा प्रवास सुखकर होण्याऐवजी यातनामय आणि तेवढाच त्रासदायक ठरू लागला आहे. अलिकडे मडगाव मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीच्या आरक्षण व्यवस्थेचा प्रवाशांना जाचक त्रास होताना दिसून येतो आहे. या गाडीच्या तिसऱ्या सीटची अवस्था अर्ध्या भागात मुंबई ते कोकण तसेच पुन्हा कोकण ते मुंबई असा करावा लागत असून सांगता येत नाही आणि सहन होत नाही. अशा स्थितीत प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांना पाठीची दुखणी लागली आहेत. त्यामुळे आरक्षित तिकीट असताना कोकणी माणसाच्या वाट्याला असा प्रवास पाचवीला पुजलेला आहे का? अशी विचारणा होऊ लागली आहे. याबाबत कोकण रेल्वे आस्थापनेला देणंघेणं नसण्याचे दिसून येते आहे. यामध्ये कोकणातील प्रवाशांची दमछाक होत असून नेहमी कोकणाला सापत्नपणाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय? अशी शंका यावी इतपत सर्व काही चालू आहे. तरी याबाबत त्वरित दखल घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 

– प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव

मोबाईल : 99692 52991

प्रतिक्रिया व्यक्त करा