भाजपा राबविणार मतदार चेतना अभियान-जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत*
*प्रसन्ना देसाई यांच्यावर जिल्हा संयोजनाची जबाबदारी*
‘चेतना’ म्हणजेच ‘कार्यात्मक जागरूकता’ हाच उद्देश समोर ठेवत देशातील युवा पिढीला देश विकासाच्या मुख्य प्रवाहात,निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशात मतदार चेतना अभियान राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे आणि त्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
या अभियानाचा ऊद्देश म्हणजे देशातील युवावर्गाला मतदानाच्या प्रवाहात सामील करत कुणीही मतदान प्रक्रियेत वंचित राहू नये यासाठी प्रयत्न,बोगस व मयत नोंदी कमी करून मतदानाची पारदर्शकता वाढण्यास मदत, मतदार यादीतील नावे,पत्ते बदलले असल्यास प्रशासनास मदत करत,योग्य नोंद/बदल करून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत करणे अशी आहेत.
या अभियानांतर्गत मतदार संपर्क होऊ शकेल आणी मतदारांमध्ये जागरूकता वाढीस लागेल जेणेकरून कर्तव्यभावना निर्माण होत मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल.
*’भाजपाची प्रशासनास मदत करण्याची कार्य पद्धती’*
केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे, पालकमंत्री रविन्द्र चव्हाण,यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने अनेक पक्षीय अभियाने यशस्वी केलेली आहेत.सिंधुदुर्ग भाजपा प्रशासनास विधानसभा निहाय मदत व्हावी या हेतूनेच एक समिती गठीत केलेली आहे,सदर समिती प्रशासनाशी समन्वय राखत योग्य माहीती देऊन मदत करतील आणि जनजागृतीचे काम करेल .
कणकवली विधानसभेत-
मा. आ. नितेशजी राणे,कुडाळ विधानसभेत मा. निलेशजी राणे
सावंतवाडी विधानसभेत मा. राजनजी तेली यांनी विधानसभा क्षेत्रात बूथ सक्षमीकरण आणि नवमतदार नोंदणी कार्यक्रमाला अपेक्षित गती दिलेली आहे.
या अभियानांचे संयोजक प्रसन्ना देसाई, सह संयोजक रणजित देसाई,लिगल सेलचे ऍड राजेश परुळेकर,आय टी संयोजक केशव नवाथे,सोशल मिडीया संयोजक समीर प्रभुगांवकर हे विधानसभा समितीच्या साथीने
निवडणूक निर्णय अधिकारी,बुथ पातळीवरील अधिकारी (BLO) यांना सर्वतोपरी सहयोग देत मतदारसंघात युवा मतदार वर्गात चेतना निर्माण करतील.
यापूर्वीच भाजपाने संयोजक महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली ‘बुथ सशक्तीकरण अभियानात BLA-2 म्हणून कार्यकर्ता नेमणूक केलेली असून ते बुथमधील BLO यांना पूरक असे कार्य करतील.
पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रगतीशील भारत साकारण्यासाठी मतदार चेतना अभियान गरजेचे आहे.ते यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक,सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेने या अभियानात सामील व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकर सावंत,अभियान संयोजक प्रसन्ना देसाई यांनी केलेले आहे.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*