पुणे:
अरण्येश्वर शिक्षण संस्थेची स्थापना १४ जुलै १९६४ साली झाली.
पद्मावती, तळजाई पठार या एरियातील तळागाळातील मुलांसाठी माननीय श्री. कै. शिवाजीराव ढुमे यांनी ही संस्था स्थापन केली.
या १४ जुलैला या शिक्षण संस्थेला ५९ वर्षे पूर्ण होऊन साठ वर्ष चालू झाले. या साठाव्या वर्षाकडे प्रगतशील वाटचाल करणाऱ्या या शाळेचे अध्यक्ष आहेत माननीय श्री बाळासाहेब ढुमे, उपाध्यक्ष आहेत श्री. राजेंद्र ढुमे, सेक्रेटरी श्री.प्रदीप तुपे आहेत.
शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ड्रॉ. सौ.भावना जोशी व प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता गायकवाड आहेत. शाळेतील शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मिळून जवळ जवळ ६५ च्या वर स्टाफ आहे.
रोप लाविले ५९ वर्षांपूर्वी आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. शाळेमध्ये अनेक विद्यार्थी उत्तम शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी उत्तम शिक्षण घेऊन बाहेर मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
शाळेच्या या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त, हीरक महोत्सवनिमित्त वर्षभर अनेक कार्यक्रम साजरे करावेत असे ठरले आहे. त्यातील एक कार्यक्रम १४ ऑगस्ट या दिवशी साजरा झाला.
सध्या करोना काळामध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज खूपच महत्त्वाची होती. अनेकजण ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून गेले होते. तर याच पार्श्वभूमी वरती शाळेमध्ये यावर्षी वृक्षारोपण करण्याचे ठरले.
हीरक महोत्सव म्हणून ६० कुंड्यात रोपांची लागवड करण्यात आली. बाल वर्गापासून ते इयत्ता दहावी पर्यंत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आणि विद्यार्थ्यांकडून रोपांची लागवड करण्यात आली.
साठ या आकारामध्ये कुंड्या ठेवल्या व मुलांना त्या भोवती बसवले. शाळेचे महत्व सांगितले. शिक्षणाचे महत्व सांगितले.
प्रत्येक इयत्तेतून सहा कुंड्या व सहा रोप ही विभागणी केली व साठ कुंड्या व रोपे मुलांनी आणली. मुलांचा उत्साह चेहऱ्यावर दिसत होता.
अशा प्रकारे, मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या मदतीने हीरक महोत्सवाचा पहिला उपक्रम आनंदात, उत्साहात साजरा झाला.
वसुधा नाईक, पुणे
अरण्येश्वर शिक्षण संस्था
सहकार नगर पुणे ०९