You are currently viewing गणेशोत्‍सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा ठेवा – व्यापारी महासंघाची मागणी 

गणेशोत्‍सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा ठेवा – व्यापारी महासंघाची मागणी 

गणेशोत्‍सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा ठेवा – व्यापारी महासंघाची मागणी

महावितरण अभियंत्‍यांना दिले निवेदन

कणकवली

गणेशोत्‍सव कालावधीत जनतेला महावितरणकडून कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्या. तसेच गणपतीच्या अकरा दिवसांत वीज पुरवठा खंडित होता नये. त्‍यासाठीचे नियोजन आत्तापासूनच करा अशी मागणी जिल्‍हा व्यापारी महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन महासंघाने महावितरणच्या अभियंत्‍यांना दिले.
जिल्‍हा व्यापारी महासंघाचे दीपक बेलवलकर, नंदन वेंगुर्लेकर, नितीन म्हापणकर, अशोक करंबेळकर, संतोष काकडे, राजेश राजाध्यक्ष, दादा कुलकर्णी, सुप्रिया पाटील आदींनी महावितरणचे उपअभियंता विलास बगडे यांची भेट घेतली. यावेळी गणेशोत्‍सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा ठेवा याबाबत प्रामुख्याने मागणी करण्यात आली. तसेच खंडित होणाऱ्या वीज पुरवठा समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र सुंत्यान, सहाय्यक अभियंता एस. पी. राणे, प्रवीण पंडित, अमोल थोरबोले, प्रगती परसगडे उपस्थित होते.
दरम्‍यान गणेशोत्‍सव कालावधीत अखंडित वीज पुरवठा देण्याबाबतच नियोजन सुरू आहे. ज्‍या काही समस्या असतील त्यांचा तातडीने निपटारा सुरू असल्‍याची ग्‍वाही उपअभियंता विलास बगडे यांनी दिली.

 

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा