श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ.
कोकणच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणाऱ्यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून विविध व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, कृषी, क्रीडा, व्यापार ही सर्व क्षेत्रे पर्यटन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने या सर्व क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुरुषांसोबत या क्षेत्रात बरोबरीने कार्य करणाऱ्या नारी शक्तीचा प्रामुख्याने समावेश करून कोकणरत्न पुरस्कार पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने दिला जाणार आहे.
कोकणामध्ये पर्यटन हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये मच्छिमार, आंबा काजू बागायतदार, प्रोसेसींग व्यावसायिक, टूर ऑपरेटर, गाईड, होम स्टे, कृषी पर्यटन, हॉउसबोट, वॉटर स्पोट,स्कुबा डायव्हिंग या बरोबर वरील उल्लेख केलेल्या विविध क्षेत्रात योगदान समाविष्ट होत असून अश्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या रत्नाचा यथोचित संम्मान पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे केला जाणार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या वतीने कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या कोकणरत्नाचि घोषणा जागतिक पर्यटन दिनी अर्थात 27 सप्टेंबर 23 रोजी करण्यात येईल.
कोकणच्या सर्वांगीण विकासाची विचारधारा उराशी बाळगून पर्यटन व्यावसायिक महासंघ काम करीत आहे. याच विचारधारेला पुढे घेऊन जातं असताना कोकणातील व्यावसायिक, उद्योजक विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोकण रत्नाचा बहुमान मोठ्या मंचावर व्हावा अन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी अन त्यातून कोकणाच्या सर्वागीण विकास वाढीसाठी ह्या उद्देशाने कोकणरत्न पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. तरी पुरस्कार निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींनी यात सहभागी व्हावे तसेच कोंकणातील पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच पुरस्कार इच्छूक व्यक्तींनी आपली माहिती 9421153035 या क्रमांकावर 15 सप्टेंबर 2023 वर पाठवावी असे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे.