You are currently viewing स्वातंत्र्यदिनानिमित्त भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारला भारताचा नकाशा

स्वातंत्र्यदिनानिमित्त भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारला भारताचा नकाशा

मालवण :

 

मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ निमित्त हातामध्ये तिरंगा घेऊन मानवी साखळी करत भारताचा नकाशा साकार केला. वंदे मातरम… भारत माता की जय… अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होऊन मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्या उपस्थितीत प्रशाळेचे जेष्ठ शिक्षिक श्री एस के कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांनी विचार मांडत स्वातंत्र्यलढा व आज प्रगतीकडे वाटचाल करणारा भारत देश याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक पवन बांदेकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून प्रशालेच्या पटांगणावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हातात तिरंगा राष्ट्रध्वज हातात घेऊन मानवी साखळीतून भारताच्या नकाशाचा आकार साकारला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारताचा जयघोष करणाऱ्या घोषणा देऊन एक आगळी वेगळी मानवंदना भारत देशाला दिली. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा