You are currently viewing पावनाई स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने मसुरेत माजी सैनिक आणि त्यांच्या विर पत्नीचा “वीर जवान तुझे सलाम” असा अनमोल सन्मान..

पावनाई स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने मसुरेत माजी सैनिक आणि त्यांच्या विर पत्नीचा “वीर जवान तुझे सलाम” असा अनमोल सन्मान..

मसुरे :

 

सैन्य दलासारखी जगात दुसरी कोणतीही मनाला आनंद देणारी नोकरी नाही. शिस्त म्हणजे काय असते हे या नोकरीतून शिकायला मिळते आणि या सैन्य दलातून जो नोकरी करून बाहेर पडतो तो नेहमी परिपूर्ण असा घडलेला असतो. आज शालेय जीवनातही सैन्य दलाची आणि अध्यात्माची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. नेहमी सर्व क्षेत्रात पुढे असणाऱ्या मसुरे येतील पावणाई स्वयं सहाय्यता बचत गटाने आम्हा माजी सैनिकांचा जो आज मान सन्मान केलात याबद्दल या गटाच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे असे प्रतिपादन मसुरे येथील माजी सैनिक तथा माजी तलाटी धनंजय सावंत यांनी सत्कारास उत्तर देताना मसुरे येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा च्या समारोपाचे अवचित्य साधून मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत मसुरे येथील पावणाई स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या वतीने मसुरे येथील माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या वीर पत्नींचा ” वीर जवान तुझे सलाम” असा अनोखा गौरव समारंभ या बचत गटाच्या अध्यक्षा हेमलता दूखंडे यांच्या अध्यक्षतेखाली मसुरे येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावरती बचत गटाच्या उपाध्यक्ष सौ नीलम दळवी, सचिव सौ ज्योती पेडणेकर, माजी सैनिक धनंजय सावंत, अशोक मोरे, दीपक बागवे, वीर पत्नी श्रीमती कल्पना दूखंडे, प्रकाश चव्हाण, रवींद्र दूखंडे, महेश दुखंडे,विलास राणे, केंद्र शाळा मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, विजेता पारकर, मनीषा शिंदे, नूरजहा शेख, मोनिका दूखंडे, शीतल मसुरकर,शकिरा शेख,सुरेखा परब,विनोद सातार्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिक दीपक बागवे, धनजय सावंत, अशोक मोरे यांचा आणि माजी सैनिक कै.मोहन दूखंडे यांच्या वीरपत्नी कल्पना दूखंडे, कै.बिबीशन चव्हाण यांचे बंधू प्रकाश चव्हाण, कै. नारायण गावडे यांच्या पत्नी श्रीमती शानन गावडे, कै. बाबुराव राणे यांचे चिरंजीव विलास राणे, पुणे येथे असलेले मसुरे सुपुत्र माजी सैनिक श्री रवींद्र दूखंडे यांचे बंधू महेश दुखंडे यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक अशोक मोरे, दीपक बागवे, धनंजय सावंत यांनी जीवाची बाजी लावून देशासाठी लढताना प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनेक थरारक प्रसंग उपस्थित महिला वर्गाला सांगताना प्रत्येक श्रोत्याच्या चेहऱ्यावरती आनंदाश्रू आलेत.

बचत गटाच्या अध्यक्षा हेमलता दूखंडे यांनी बचत गटाच्या गेल्या २५ वर्षाच्या कार्यकाळाचा आणि कामाचा आढावा उपस्थितांना विशद करून यापुढेही या महिला बचत गटाच्या माध्यमातून समाजभिमुख काम करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितना दिले. माजी सैनिक अशोक मोरे यांनी युद्धभूमीवर आपल्याला शत्रूची गोळी लागलेली असतानाही युद्धभूमी वरती देशासाठी लढताना आलेल्या चित्त थरारक प्रसंग जागा करून त्याप्रसंगी देशसेवा हेच आपले जीवन असल्याचे यावेळी सत्कारास उत्तर देताना सांगितले. माजी सैनिक दीपक बागवे यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीर जवानांचा सत्कार करणारा मसुरे येथील श्री पावणाई स्वयंसहायता महिला बचत गट हा पहिला बचत गट असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला या बचत गटाचा सार्थ अभिमान आहे.

आज माजी सैनिकांचा सन्मान करताना या बचत गटाने एक सामाजिक बांधिलकी जोपासून समाजापुढे एक अनोखा आदर्श ठेवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक विनोद सातार्डेकर यांनी केले. विनोद सातार्डेकर यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन या बचत गटाच्या वतीने त्यांचा लक्ष्मी पेडणेकर यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. मसुरे गडगेरा बाजारपेठ येथील महेश दूखंडे परिवारातील चार पिढ्या या सैन्य दलात देश सेवा बजावल्यामुळे या परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत मनीषा शिंदे व आभार सौ शितल मसुरकर यांनी मानले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा