You are currently viewing मंदार शिरसाट यांचा कुडाळच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

मंदार शिरसाट यांचा कुडाळच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

मंदार शिरसाट यांचा कुडाळच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

कुडाळ :

कुडाळ नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की गेल्या वर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत कुडाळ शहरात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि मला पहिल्या टर्म मध्ये कुडाळ शहराचे उपनगराध्यक्ष पद भूषवयायचा मान मिळाला. ह्या काळात कुडाळ शहरातील विविध विकास कामे करण्याचा मी व माझ्या सर्व सहकार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कुडाळ मध्ये अद्यावत अग्निशमन बंब,लहान मुलांसाठी गार्डन व प्रत्येक वॉर्ड मध्ये विविध विकास कामे केली. कित्येक वर्षे प्रतिक्षेत असलेला भंगसाळ येथील गणेश घाट काम देखील यावर्षीच चालू होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कुडाळ मधील प्रमुख असलेल्या कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व तो प्रश्न यावर्षी मार्गी देखील लागेल तसेच अद्यावत मच्छिमार्केट, भाजी मार्केट उभारण्यात येण्या साठी प्रयत्न चालू आहेत.

कुडाळ शहरातील वीज समस्या सोडविण्यासाठी ट्रान्सफॉर्मर यांची देखील मागणी करण्यात आली. येणार्‍या काळात उर्वरित कामे करण्यासाठी मी माझा सहकाऱ्यांसोबत नेटाने काम करेन, असा शब्दही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. मला कुडाळ उपनगराध्यक्ष म्हणुन काम करण्याची संधी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवाडकर, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, प्रविण पाटकर, संजय पडते, अमित पेडणेकर व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, असे प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहीर केले आहे.

 

*संवाद मिडिया*

*प्रवेश सुरू..प्रवेश सुरू.. 2023 – 2024*🏃‍♂️🏃‍♀️

*पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी…*

*डॉ. आठवले कॅम्पस*

🩸 *D.M.F Paramedical Institute-DEVGAD*🩸

*_कॅम्पस कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने खालील कोर्सेस उपलब्ध_*

*_♻️कोणत्याही शाखेच्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी_*♻️
🔹 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री

*♻️दहावी पास विद्यार्थ्यांसाठी♻️*
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑप्टोमट्री

*✅कोर्सचा कालावधी १ वर्ष* 1️⃣

*🔰आवश्यक कागदपत्रे 🔰*
💠लिव्हिंग सर्टिफिकेट
💠 दहावी व बारावी पास माार्कलिस्ट
💠दोन आयकार्ड साईज फोटो
💠आधार कार्ड झेरॉक्स

*🏬सुसज्य अत्याधुनिक लायब्ररी*
*🔬आधुनिक डायरेक्ट डिजिटल एक्स-रे प्रणाली*
*🕴️उच्चशिक्षित प्रशिक्षक*
*📚डिजिटल लायब्ररी*

*💸’हप्त्याने फी भरण्याची सोय*

*संपर्क*👇
*देवगड मेडिकल फाउंडेशन*
*📲 7382821000*
*📲 7382822000*

*⏰सकाळी 9 ते 12 वा. | दुपारी 3 ते 6 वा*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/105854/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा