तरंदळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुशील कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
कणकवली
तरंदळे ग्रामपंचायत वतीने 15 ऑगस्ट 76 व्या स्वांतत्र्य दिनानिमित्त सकाळी 8.30 वाजता ध्वजारोहण सरपंच श्री सुशिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती चांगल्या प्रमाणावर होती.अशीच उपस्थिती इतर ही कार्यक्रमाला असावी अशी सरपंच सुशिल कदम यांनी इच्छा व्यक्त केली.सामाजिक कार्यकर्ते श्री.मधुसूदन सावंत व माजी सरपंच तंटा मुक्त अध्यक्ष सन्माननीय श्री.जयसिंग नाईक यांनी आपले विचार मांडले.ह्यावेळी दोघांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली.सरपंच श्री सुशिल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचे स्वागत केले व आभार ही मानले.खास करून युवा नेतृत्व यांनी पुढे येवून आपल्या गावा साठी योगदान दिले पाहिजे.गावा मध्ये च उद्योजक निर्माण केले पाहिजेत. आजची तरुण पिढी वॉट्स अप,फेसबुक ह्यासारख्या प्रसार माध्यमांच्या बळी पडत आहेत. व्यसना कडे जास्त जात आहेत.त्यासाठी मुलांकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.उपस्थित नागरिकांना 76 व्यां स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित सरपंच श्री. सुशिल कदम,उपसरपंच सौ.शुभावली सावंत,ग्रामपंचायत सदस्य (तेजस सावंत,संजय परब,दीपक घाडी. ग्रामपंचायत सदस्य सुनिल दत्त जाधव,नेहा घाडी गावकर,संजना राणे,वैशाली घाडी गावकर,) माजी सरपंच श्री. सुधीर सावंत,तंटामुक्त अध्यक्ष श्री.जयसिंग नाईक,उप तंटामुक्त अध्यक्ष श्री.सत्यवान राणे,ग्रामसेवक.रेश्मा पालकर, माजी सदस्य. देवा रावले,(सामाजिक कार्यकर्ते.अमित सावंत,सागर सावंत,मधुसूदन सावंत,शरद सावंत),तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अभय सावंत,शामू गावकर,वनिता कदम गावातील आशा ताई,मुख्याध्यापक कुलकर्णी मॅडम, लोकरे मॅडम,शिक्षक वर्ग,अंगणवाडी सेविका, मदतनीस,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला वर्ग आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी सत्कार मध्ये विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थी ग्रामपंचायत कडून सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य श्री सुनिल दत्त जाधव यांच्या संकल्पनेतून बलून सजावट करण्यात आली होती.विशेष करून त्यांनी खूप मेहनत घेतली.त्यांना मदत करण्यासाठी अविनाश जाधव,अभय सावंत,राहुल कदम,प्रमोद जाधव,प्रणय जाधव उपस्थित होते.त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो व आभार ही मानतो.तसेच सावूंड व्यवस्था पुरवली ते ग्रामपंचायत सदस्य श्री सुनिल दत्त जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत कडून त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करतो. व आभार ही मानतो.सर्व उपस्थित नागरिकांचं आभार मानण्यात आले