You are currently viewing अनलॉक ४- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय सुरू आणि काय बंद….
जिल्ह्यात एकूण 641 जण कोरोना मुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 605

अनलॉक ४- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय सुरू आणि काय बंद….

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या विळख्यात सापडलेले देशवासीय या बंधनातून हळूहळू मुक्त होत आहेत. देशात १ सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत असून या टप्प्यात राज्यातील नागरिकांना आणखी काही बाबतीत दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या गाइडलाइन्स जारी झाल्यानंतर तसे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, गृहमंत्रालयाने शनिवारी अनलॉक – 4 मार्गदर्शक सूचना जारी केल्या. येत्या ७ सप्टेंबरपासून देशभरात मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. मेट्रोसह अनलॉक – 4 मध्ये आणखी काय सुरू होईल आणि काय बंद असेल ते जाणून घेऊया…

हे होईल सुरू—–
# मार्गदर्शक सूचनांनुसार ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू केल्या जातील.
# २१ सप्टेंबरपासून १०० नागरिकांची उपस्थिती असेल असे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करता येतील. अशा कार्यक्रमांमध्ये किंवा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग करणं बंधनकाकर असेल.
# ओपन एअर थिएटर २१ सप्टेंबरपासून खुली करण्यास परवानगी आहे.
# २१ सप्टेंबरपासून ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत येण्याची परवानगी
# २१ सप्टेंबरपासून शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ऐच्छिक आधारावर (कंटेन्मेंट झोन बाहेरील) ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल.
# २१ सप्टेंबरपासून तांत्रिक शआणि व्यवसायिक शिक्षण असलेल्या (ज्यासाठी प्रयोगशाळा आवश्यक आहे) उच्च शिक्षण क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था सुरू होतील.
परंतु ६५ वर्षावरील व्यक्ती तसेच १० वर्षाखालील मुले यांनी घरीच रहावे, तर गरोदर महिलांनी गरज असल्याखेरिज बाहेर पडू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारांना केंद्र सरकाराच्या पूर्व परवानगीशिवाय स्थानिक स्तरावर लॉकडाऊन लावता येणार नाही. लॉकडाऊन लावण्याचा त्यांना केवळ कंटेनमेंट झोनपूरताच अधिकार असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा