You are currently viewing अभियंता विराज नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

अभियंता विराज नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सावंतवाडी
मूळ सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील रहिवासी आणि पुणे येथे नोकरीनिमित्त राहणारे ऑटोमोबाईल इंजिनिअर विराज सावळाराम नाईक (37) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा त्यांच्यावर न्हावेली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच व नऊ महिन्यांची कन्या, भाऊ, वडील, बहीण असा परिवार आहे. पत्रकार राजेश नाईक यांचे ते बंधू तर वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राचे कर्मचारी सुनील नाईक यांचे ते पुतणे होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा