कळसुलकर हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवंत राज्यात आव्वल आहे.मात्र या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा 120 शाळा हे शून्य शिक्षकी शाळा आहेत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. ते कळसुलकर हायस्कूलमध्ये आज वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार राऊत पुढे बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक विश्वात राज्यात आघाडीवर आहे त्याचे श्रेय शिक्षक व शैक्षणिक संस्थांना देणे आवश्यक आहे.यात राजकारणाचे कोणतेही श्रेय नाय. मातृभाषेतून आपण शिक्षण घेतले पाहिजे त्यातून दर्जेदार नागरिक घडत असतो.आज मातृभाषेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला बॅरिस्टर नाथपई मधु दंडवते यासारखे अनेक विचारवंत भेटले त्यांनी जिल्ह्याचे नाव देशभर चमकवले असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, बाळा गावडे,शब्बीर मणियार, माजी जिल्हा परिषद मायकल डिसोजा, अपर्णा कोठावळे, सागर नानोसकर,जावदे शाहा समीरा खलीप,आदी उपस्थित होते