सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. नवनियुक्त सदस्यांचा पदग्रहण सोहळा विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, पोलिस इन्स्पेक्टर ऋषिकेश अधिकारी व सब इन्स्पेक्टर जगन्नाथ पाटील, सावंतवाडी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये नवनिर्वाचित विद्यार्थी प्रमुख प्रतिनिधी कुमार वैष्णव सावंत व प्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी अस्मि सावंत यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सॅश, बॅनर , ध्वज, बॅज इत्यादी सन्मानचिन्हे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, ब्लू म्हणजेच ‘जल हाऊस ‘ चा कप्तान ‘ रेहान दुर्वेश ‘ व उपकप्तान ‘ चैत्राली पाटील ‘ , ग्रीन म्हणजेच ‘ पृथ्वी हाऊस ‘ चा कप्तान ‘ ‘तनिष्क निर्मले’ व उपकप्तान ‘ गौरीश परब ‘ , रेड म्हणजेच ‘ अग्नी हाऊस ‘ चा कप्तान ‘ तन्मयी परब ‘ व उपकप्तान ‘गौरांग परब ‘ , येल्लो म्हणजेच ‘वायू हाऊस’ चा कप्तान ‘ मोझेस महाडे’ व उपकप्तान ‘ मनवा साळगावकर ‘ या सर्व नियुक्त विद्यार्थ्यांना सॅशेज, बॅजेस, बॅनर, ध्वज देऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. तसेच , प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार आहे हा संदेश देणारे एक छोटेसे नाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे, पालकांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सौ. ग्रीष्मा सावंत यांनी केले. प्रमुख पाहुणे पोलिस इन्स्पेक्टर ऋषिकेश अधिकारी व सब इन्स्पेक्टर जगन्नाथ पाटील यांनी नियुक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीचे मार्गदर्शन केले. नियुक्त विद्यार्थ्यांनी संचालन व शापथविधी सोहळा पार पाडला. तसेच, विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुख यांनी नियुक्त पदाचे कर्तव्य आपल्या शब्दात मांडले. त्यांच्या पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व प्रशालेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहा. शिक्षिका सौ. जागृती प्रभू तेंडोलकर यांनी आभाप्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेचे समन्वयक सौ. सुषमा पालव , सौ. शीला चव्हाण व सौ. जरिन शेख तसेच शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहाय्य लाभले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कायक्रमाची सांगता करण्यात आली.