इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ॲन्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटमधील हर्ष मालदे, शिवांजली निगडे, साक्षी शहा, भक्ती बीरे, शिवतेज थोरात, तनव मिगलानी या विद्यार्थ्यांची इपीक गारमेंटस, हॉगकॉंग येथील कंपनीमध्ये निवड झाली आहे.
यापूर्वी डीकेटीईमधून १०८ हून अधिक विद्यार्थी परदेशातील मस्ट कॉर्पोरेशन (हॉगकॉंग), सीजीएम (द.अफ्रिका), स्टॅण्डर्ड कार्पेट (दुबई), थाई अंबिका केमिकल (थायलंड), नॉईज जीन्स (बांग्लादेश), स्पाईका (व्हीएतनाम), पर्ल ग्लोबल (बांग्लादेश) व एसआरएफ (दुबई) येथे भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. डीकेटीईचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी व कंपन्या यांच्याशी असलेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी शिकत असतानाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्यांना नोकरीची संधी प्राप्त होत आहे. अशाप्रकारे सर्वांगीण तयारी करुन घेतल्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याचे देखील परदेशात जावून चांगल्या पॅकेजवर नोकरी करण्याचे स्वप्न साकार होत आहे.
इपीक गारमेंटस ही आंतरराष्ट्रीय ऍपेरिएल मॅन्युफॅक्चरींग मधील नामवंत कंपनी आहे. या कंपनीची बांग्लादेश, जॉर्डन, इथोपिया इ. देशांमध्ये मॅन्युफॅक्चरींग युनिटस असून त्यांचे मुख्य कार्यालय हॉगकॉंग येथे आहे. इपिक ग्रुप जगभरात वॉलमार्क, ऍमेझॉन, जेसी पेंडरी, हॉटीका, एरोपोस्टले, टेस्को – ऍकॅडमी इ. ठिकाणी त्यांचे गारमंेंटस एक्सपोर्ट करते.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या प्र. संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा.एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.