मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध क्षेत्रातील कामगारांच्या उन्नत्ती व प्रगतीकरीता असंघटीत कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणेचा अतिशय चांगला निर्णय घेवून राज्य सरकारने असंघटीत कामगारांना दिलासा दिला आहे.
सध्या नोंदीत कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रम यांचा लाभ भरीव स्वरूपात मिळत आहे. कारण सदर कामगार हे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३ नुसार, संबंधित आस्थापना / संस्थेकडून नाेंदीत झालेले आहेत.
मात्र, अद्यापही महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३ नुसार, ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत असणाऱ्या कापड दुकाने / औषधी दुकाने / हॉटेल्स / लहान दवाखाने / पतसंस्था / सोसायट्या / मॉल्स / माल वाहतुक संस्था अशा विविध क्षेत्रातील मालक वर्गानी संबंधित कामगारांची, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे सुरुवातीपासून ते आजअखेर पर्यंत शासन नियमानुसार नोंदणी करून वर्गणी भरलेले दिसून येत नाही. ही बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर आहे. यामुळे आजमितीला लाखो कामगार शासनाच्या योजना, उपक्रम आणि लाभांपासून वंचित व उपेक्षित आहेत. यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा १९५३ नुसार, वरीलप्रमाणे नमूद विविध क्षेत्रातील कामगार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत झाल्यास खऱ्या अर्थाने कामगार वर्गांची सर्वांगीण उन्नती व प्रगती साधण्याचे कार्य, राज्य शासनाकडून अधिक जोमाने तसेच प्रभावीपणे होणार आहे.
त्यामुळे शासन निर्णय, अटी व शर्तीस अनुसरून राज्य सरकारच्यावतीने संबंधित विभागाने योग्य ते आदेश पारीत करावेत. जेणेकरून लाखो कामगारांना लाभ मिळेल. यासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशच्यावतीने शासनास पूर्ण सहकार्य करण्यात येईल. अशाप्रकारचे लेखी निवेदन सोमवार ७ ऑगष्ट रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, प्रधान सचिव कामगार, राज्याचे कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना प्रत्यक्ष दिले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.
यावेळी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे खजिनदार देवराव कोंडेकर, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे,(एसईओ) सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, मुंबई कार्याध्यक्ष सत्यवान भास्कर, उपाध्यक्ष केरबा डावरे, प्रविण बहिरट, महादेव चक्के, दत्तात्रय शिरोडकर, काशिनाथ जनगावे, दत्तात्रय मुळीक, अच्युतराव माने, मारुतीराव जाधव, किसन शिर्लेकर, गुणवंत मिसलवाड, भरत सकपाळ, संजय कदम, दिलीप साटम, नरेंद्र रहाटे, शैलेंद्रनाथ इंगळे, भगवान माने, संजय सासणे, गजाननराव घाडगे, रत्नाकर शिंदे आदी प्रमुख कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
https://sanwadmedia.com/105608
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*