*सावंतवाडी अर्बन बँक*
*अजित नाडकर्णी उपोषणावर ठाम*
फोंडाघाट
सावंतवाडी अर्बन बैंक लिक्विडेशनमध्ये गेल्याने माजी संचालक अजित नाडकर्णी यांचे १६ ऑगस्टचे उपोषण निश्चित आहे. बँकेच्या सावंतवाडी मुख्य कार्यालयासमोर ते उपोषणाला बसणार आहेत.
म्हातारी मेल्याचं दु.ख नाही.काळ सोकावता नये, असे नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
आज बँकेचे निवृत्त सीईओ यांनी पत्र पाठवुन उपोषण मागे घेण्याची अजित नाडकर्णी यांना विनंती केली आहे. आपण माजी संचालक असून रिटायर्ड सीईलो वर कसा विश्वास ठेवु? बँकेचे चेअरमननी स्वता भेट घेवुन चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता असे नाडकर्णी यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळवले आहे. यापूर्वीही नाडकर्णी यांनी सर्वांना याची कल्पना दिली होती. तरीही याबाबत विचार केला गेला नाही. त्याचेच हे परिपाक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. जर बँक चेअरमन ने यात लक्ष घातले असते तर यातून सुवर्णमध्य निघाला असता. 16 मे ला निवृत्त झालेल्या सीईओवर आपण कसा विश्वास ठेवावा याबाबतही नाडकर्णी शाशंक आहेत. ज्या प्रकारे भुदरगड ही पतसंस्था डब्यात गेली.तोच प्रकार सावंतवाडी अर्बन बँकेचा होऊ नये याबाबत माजी संचालक म्हणून नाडकर्णी यांना काळजी आहे. काही ठेवीदारांचाही पैसे न मिळाल्यामुळे अजित नाडकर्णी यांना माजी संचालक म्हणून विचारणा होत आहे. एका परब नामक व्यक्तीने ठेवी परत न मिळाल्यास आत्महत्या करणार असेही सांगितले आहे. या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्याशी नाडकर्णी यांनी चर्चा केली. आमदार नितेश राणे यांनी सांगितले की जर बँकेत भ्रष्टाचार असेल तर त्यात कोणीही कोणाला पाठीशी घालणार नाही. बँक क्लिअर असेल तर सगळे व्यवहार सुरळीत होतील. बँकेचे शाखा अधिकारी व सीईओ यांच्यात जे साटेलोटे होते, निवृत्त झाल्यानंतरही सीईओ बँकेत का येतात असा सवालही त्यांनी केला आहे. आपल्याला बँकेची बदनामी करायची नाही आहे, परंतु ठेवीदारांना होणाऱ्या त्रासाबद्दल माजी संचालक म्हणून आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी पत्रकार द्वारे कळवले आहे.. त्यामुळे आपले सावंतवाडी येथे अर्बन बँकेसमोर 16 रोजी असलेले उपोषणावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
तरी अजित नाडकर्णी यांचे १६ तारीखला उपोषण सावंतवाडी बँक समोर होणार असुन सक्षम बँकेचे चेअरमनी यात लक्ष घातला तरच मार्ग निघेल.म्हातारी मेल्याचं दु.ख नाही.काळ सोकावता नये, असे नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.