*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याचीवाडी येथे भरले रानभाजांचे प्रदर्शन*
कुडाळ
मंगळवार दिनांक ८ऑगस्ट २०२३ रोजी जि.प पूर्ण प्राथ शाळा पावशी मिटक्याचीवाडी येथे बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले .
या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाचे काही कर्मचारी उपस्थित होते . डॉ. सौ .कुशे आरोग्यसेवक श्री . रणशूर आरोग्य सेविका सौ. नेरूरकर
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व आशा सेविका सौ सानिका देसाई , पावशी ग्रामपंचायत सदस्य सौ. स्नेहा पंडीत ,पालक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री परुळेकर सर यांनी उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले व रानभाजांचे प्रदर्शन या उपक्रमाविषयी माहिती दिली . डॉ. सौ कुशे यांनी मुलांना रानभाजांचे आहारातील महत्त्व खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. रानभाजांतून मिळणाऱ्या जीवनसत्त्वांची माहिती दिली.
मुलांनी आपल्या पालकांच्या मदतीने रानातील विविध भाजा आणल्या होत्या. यामध्ये कुड्याच्या शेंगा , दुदुरलीची भाजी , एक पानाची भाजी , कुरडू , टायकुळा , अळू , सूर णाचा पाला , घोट्याचा वेल , शेवग्याचा पाला , पेवगा , आडाळ्याची भाजी या सर्व भाजा आकर्षक पद्धतीने मांडल्या होत्या . या भाजांची नावे ती कशी बनवतात त्या भाज्यांतून कोणते घटक शरीराला मिळतात. याविषयी काही मुलांनी माहिती सांगितली. तसेच सर्व विध्यार्थ्यांनी हिरव्या हिरव्या रंगाची पालेभाजी छान हे पालेभाजांचं महत्त्व सांगणारे बालगीत म्हटले.
अशा पद्धतीने शाळेत रानभाजांचे प्रदर्शन मांडले व या भाजांचा पोषण आहारात उपयोग केला गेला .