You are currently viewing गालगागा गालगागा

गालगागा गालगागा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल*

 

*मनोरमा वृत्त*

(गालगागा गालगागा)

गझल

 

*शल्य…*

 

बोलताना चूक झाली

मित्रता नाजूक झाली

 

जन्म देता माय गेली

भावनाही मूक झाली

 

वार शब्दांचाच हृदयी

आसवे भावूक झाली

 

पामराला सौख्य दिसले

वंचना अंधूक झाली

 

प्रेम आकर्षण न कळले

वासना मग भूक झाली

 

गोड वाचा मत्सरी मन

माणसे घाऊक झाली

 

दान देणे आणि लुटणे

ती सवय ठाऊक झाली

 

© दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

८४४६७४३१९७

प्रतिक्रिया व्यक्त करा