*हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा पाचवा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
वैभववाडी
वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा पाचवा स्मृतिदिन वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. विनोदजी तावडे साहेब यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा चिरंजीव अगस्त्य व त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन पत्रे पाठवली आहेत.
तसेच महाविद्यालयात देशभक्तीपर गीते, भाषण व रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी प्रास्ताविकेतून मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. डॉ. डी. एम. शिरसट, कु. तुषार पार्टे व कु. प्रणिता फोंडके यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या जीवनावर मनोगते व्यक्त केली. कौस्तुभ रावराणे यांच्या बलिदानातून तरुणांनी देश सेवेची प्रेरणा घ्यावी असे
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांनी सांगितले. कु. हर्ष नकाशे आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन शहीदांना आदरांजली वाहिली.
तसेच हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे मित्र मंडळ, सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठान, रोटरी क्लब वैभववाडी व राजेश पडवळ जनसेवा ट्रस्ट यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
संपूर्ण कार्यक्रमाला आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा.निलेश कारेकर यांनी केले तर प्रा.डॉ.एम.आय.कुंभार यांनी आभार मानले.