You are currently viewing प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासनाकडून शौर्य, खेळ, सामाजिक सेवा,विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि नाविण्यपूर्ण कार्य या क्षेत्रात अतुलनिय कार्य केलेल्या  जो भारतिय नागरिक असलेल्या व ज्याचे वास्तव भारतात आहे व ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त नाही. अशा बालकांकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे.

 केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दरवर्षी निस्वार्थी कृती व अतुलनिय शौर्य गाजविलेल्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. क्रीडा, खेळ, सामाजिक सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि नाविण्यपूर्ण काम या क्षेत्रात अतुलनिय कार्य केलेला कोणताही बालक, जो भारतीय नागरिक असून ज्याचे वास्तव्य भारतात आहे व ज्यांचे दि. 31 ऑगस्ट2023  रोजी 18 वर्षापेक्षा जास्त नाही. तसेच दि.1/9/2021 ते दि. 31/8/2023 या कालावधीत उच्चकोटीची असामान्य क्षमता व कौशल्य मिळवलेल्या बालकांकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी नामनिर्देशन मागविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार खालील दोन प्रकारात देण्यात येतो.

बाल शौर्य पुरस्कार:- नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित संकटात, स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्राणाची बाजी लावून अतुलनिय शौर्य गाजविणाऱ्या किंवा मानसिक कणखरपणाने तात्काळ प्रतिसाद देऊन स्वतःला किंवा समाजातील कुणालाही वाचविणाऱ्या शुर बालकाला बाल शौर्य पुरस्कार दिला जातो,

बाल नैपुण्य पुरस्कार :- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पुढील 6 प्रकारात असामान्य यश व उच्चकोटीची असामान्य क्षमता व कौशल्ये मिळवणाऱ्या बालकाला दिला जातो. क्रीडा, सामाजिक सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान,पर्यावरण,कला व संस्कृती, नाविण्यपूर्ण शोध.

पुरस्कार सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक व 1 लाख रोख रक्कम अशा स्वरुपात दिला जातो. पूर्ण देशात 25 पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार दि. 26 डिसेंबर रोजी घोषित केला जातो. त्याचे वितरण जानेवारी मध्ये केले जाते. पुरस्कारासाठी निवड राष्ट्रीय निवडसमिती कडून करण्यात येते.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी सार्वजनिकरित्या खुले नामनिर्देशन हे केवळ http://awards.gov.in या पोर्टलवर स्विकारले जाईल. पोर्टल व्यतिरिक्त प्राप्त होणार नामनिर्देशन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामनिर्देशन स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे. सदरची लिंक भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या कार्यालयीन वेबसाइट www.wed.nic.in उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, ए ब्लॉक कक्ष क्र. 106. ओरोस सिंधुदुर्ग- नगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८६९ येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. रसाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा