सावंतवाडी
उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण-सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून सावंतवाडी दिवाणी न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. तालुका विधी सेवा समिती-सावंतवाडी व तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे राष्ट्रीय लोकअदालत . होणार आहे. ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारीकडील खटले किंवा सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती- सावंतवाडी या कार्यालयाकडे दाखल करावीत असे आवाहन तालुका सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्रीम. डी. बी. सुतार व अॅड. नीता सावंत- कविटकर यांनी यांनी केले आहे,