You are currently viewing मसुरे मध्ये माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा अनोखा सन्मान

मसुरे मध्ये माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा अनोखा सन्मान

मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या माध्यमातून अनोखा उपक्रम…

 

मसुरे :

 

महसूल सप्ताह अंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी या विषयासंदर्भात मंडळ अधिकारी कार्यालय मसुरे येथे कार्य तत्पर मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माझी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या समस्या व अडीअडचणी बाबत विचारणा करण्यात आली.

यावेळी माजी सैनिक श्री.धनंजय रमेशचंद्र सावंत (सेवानिवृत्त तलाठी), श्री.दिपक अनंत बागवे (रास्तधान्य दुकानदार देऊळवाडा) यांचा श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत माजी सैनिक कै.बाबुराव राणे यांच्या पत्नी श्रीम.उषाबाई बाबुराव राणे व कै.नारायण गावडे यांच्या पत्नी श्रीम.शानन नारायण गावडे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या समस्या व अडीअडचणी बाबत विचारणा करण्यात आली व त्यांचाही शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शासनाच्या विविध अर्थसाह्य योजना, सलोखा योजना याबाबत माहिती देण्यात आली. मयत खातेदार यांचे वारस तपास करून घेण्याबाबत मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांनी माहिती दिली. या वेळी मंडळातील तलाठी आर.एस.शेजवळ, तलाठी एस.पी.लखमोड, कोतवाल सचिन चव्हाण, संतोष चव्हाण, विकास पोयरेकर, डाटा ऑपरेटर श्रीकांत खोत, प्रतिक्षा परब, महसूल कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा