वैभववाडी
शैक्षणिक वर्ष २०२३/२४ चा मुंबई विद्यापीठात मार्फत घेण्यात येणारा ५६ वा विभागीय युवा महोत्सव आयोजित करण्याचा मान प्रथमच वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास मिळाला आहे. सदर युवा महोत्सव गुरुवार दिनांक १० ऑगस्ट,२०२३ रोजी संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी विभागीय युवा महोत्सवाच्या नियोजनाची बैठक आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन.व्ही गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग समन्वयक उपस्थित होते. या नियोजन बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ.आशिष नाईक व सहाय्यक समन्वयक नितीन वळंजू यांनी मार्गदर्शन केले. सदर सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य,समूह गायन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, रांगोळी, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, मेहंदी, स्पॉट पेंटिंग, तालवाद्य, सूर वाद्य, एकांकिका मुकअभिनय, स्कीट, मिमिक्री अशा एकूण ४२ कला प्रकाराचा समावेश असून जिल्ह्यातील सुमारे १२०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या ५६ व्या सांस्कृतिक विभागीय महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे पदाधिकारी तसेच सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे याशिवाय वरील सर्व कला प्रकारातील दिग्गज परीक्षक उपस्थित राहणार आहेत. विभागीय महोत्सवामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सांस्कृतिक युवा महोत्सवाचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता महाराणा प्रतापसिंह संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष मा. सज्जन विनायक रावराणे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठातील विविध पदाधिकारी तसेच महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा. प्रा. डी. एस. बेटकर, प्राचार्य डॉ. सी एस काकडे, महाविद्यालयाचे अधिक्षक श्री.संजय रावराणे यांनी केले आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी सांस्कृतिक युवामहोत्सव समिती सदस्य
सहा. प्रा. निलेश कारेकर 8275664956
डॉ. एम.आय.कुंभार 9421148002 डॉ. व्ही.ए.पैठणे 8010326422
सहा. प्रा. आर.ए.भोसले 7517284228
यांच्याशी संपर्क साधावा.