*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गझल*
वृत्त : मंजुघोषा
(गालगागा गालगागा गालगागा)
रान खाणे राक्षसी ही भूक आहे
(ही तुझी बेताल वृत्ती चूक आहे?)
वाटते मज आज थोडे कोंडलेले
दुःख विकले मी तसे घाऊक आहे
खेळ, खोड्या खूप केल्या सोबतीने
सोडताना मी किती भावूक आहे
एक ‘ती’ हृदयातली वाचाळ होती
भेटल्यावर का अशी मग मूक आहे?
सुख अता स्वप्नातही का येत नाही
कोणता तो राखलेला डूक आहे ?
श्रीनिवास गडकरी
रोहा, पुणे
9130861304