*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अरे! कशाला लिहितोस…!!*
निसरड्या तात्विक भूमिकेवर
आसूड तूच ओढतोसं
भेगा ढेकळं दाखवतं
अंगावरचे घाव लपवतोसं…
युध्दाला तोंड फुटलंकी
पलंगावर जाऊन बसतोस
चषक हातात उंचावून
गुलाबांवर लिहीत राहतोस..
भरगोस केस उगवलेत
जखमांना खपली नाही
साहित्य पिकतही नाही
विकताही येत नाही…
शब्दांना वाया घालवण
शब्दांनाही आवडत नाही
मुक्यामाराचे बोलके डाग
वाॅटसएॅपने जाणार नाही..
हिरव्यातला पिवळा रूसवा
गुलाबांसोबत रोज काढतोस
वास्तवाला !किनार स्वप्नाळू
कशाला उगाच लिहितोस…!!
बाबा ठाकूर