समाजातील सुखदुःखमय जिवनानुभवाचे सुंदर वास्तववादी चित्रण…..
पुस्तक… “रंग जीवनाचे”
(नवरसकथासंग्रह)———-
मान्यवर, खरंच आयुष्याचं कोडं कुणालाही सोडवता येत नाही. कारण मानवी जीवनात प्रत्येकाला हवं तसं किंवा आपल्या मनाप्रमाणे हवं असलेलं कधीही घडतंच नाही. मग कितीही खटाटोप करा.जे नशिबात लिहिले आहे त्यानुसारंच घडते,ते कदापिही चुकतं नाही. मुख्य म्हणजे आयुष्यांत क्षणभर सुख अन् मनभर दुःख अशी ही सर्वांच्या आयुष्याची कथा आहे. खरं तर मानसाचं जीवन हे, हर्ष, खेद, चिंता, करुणा, राग, द्वेष यांनी अगदी खच्चून भरलेलं असतं. कधीतरी क्षनभरंच सुखाचे, आनंदाचे प्रसंग येतात अन् त्या प्रसंगाची किंबहुना, सुखदायी क्षणांची साथसोबत मिळते.क्षनभरासाठी आपल्या आयुष्याचं नंदनवन बहरुन जातं.. पुन्हा दुःखाचे रणरणते ऊन जाणवु लागते.. किंबहुना जीवन काही अंशी सुखदायी तर बहुतांशी दुःखदायक ठरत असतं..
हे असं का घडतं? ह्याचं कारण म्हणजे मानवांचे गतजन्मीचे कर्मभोग…
मान्यवर मानसाचं जीवन हे गतकर्मभोगामुळेंच,विविधरंगी झालं आहे. मग तो मनुष्य हा श्रीमंत असो वा गरीब, कुठलाही असो, तो सुखापेक्षा अनेक दुःखानींच पोळुन निघालेला असतो ही वस्तु स्थिती आहे. प्रत्येकांचं आयुष्य काम, क्रोधादी षड्विकारांच्या गुणांनी विविधरंगी बनवलेलं असतं. तसंच आयुष्यात हर्ष, राग, द्वेष, खेद, दया, प्रेम, करुणाई, भावभावनांमधुन रसमय झालेलं दिसुन येतं. आपली जर पारखी, नजर असेल तर, प्रत्येक मानसाची, एक वेगळीच जिवनकथा असते असं दिसून येईल, अशा ह्या विविध रंगी विविध भावभावनांचे रसमय जिवनकथांना अलगद टिपुन त्याला सुंदर लिपिबद्ध करावं ह्या विचाराने मी झपाटुन गेलो. समाजातील अशा विविध रसमय जीवनाचं वास्तव रेखाटु लागलो. ह्यातुनंच माझ्या ह्याा “रंग जीवनाचे” ह्या नवरस कथा संग्रहाचा जन्म झाला.
खरंतर प्रत्येकाचं जीवन हे वैविध्यपुर्ण अशाविविधरंगी भावभावनांमुळे इंद्रधनुषी रंगांचं बनवलेलं आहे अन् ते सतत काळाच्या प्रवाहात बदलत असते,कधी राग, तर कधी लोभ तर कधी, माया मोह ममता आणि प्रेम अशा विविध भावभावनांमुळे मनुष्याला क्षणीक सुख तर अप्रतिम दुःखाचा अनुभव मिळतो.आपण, ह्या सर्वांकडे अलिप्तपणे किंवा तटस्थपणे पाहुन विविधरंगीी “इंद्रधनुषी” जीवनाचा आनंद घेत राहिलो तर आपण कधींच दुःखी होणार नाही असं मला वाटतं.
रसिक वाचक हो…
अशा ह्या विविधरंगी “रंग जीवनाचे” कथा संग्रहावर भरभरुन प्रेम करालंच. तसेच ह्या कथा संग्रहातील जिवनानुभवांच्या, खजिन्यातील वाचनानंदाचा सुखद सुखद अनुभव सर्वांनांच आनंदी जिवन जगण्यासाठी तेजस्वी अशी “सकारात्मक जिवन ऊर्जा” प्रदान करेल, ह्याची मला खात्री आहे.
लेखक – श्री. जगन्नाथ चां खराटे, यशोधन नगर, ठाणे,
संपर्क क्र. – ८६५२६२९०६८..
(पुस्तक खरेदीसाठी संपर्क.. किताबरायटीगं पब्लिकेशन्स
दिव्या त्रिवेदी.. संपर्क – 7506994878 )