You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मैत्रीदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मैत्रीदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मैत्रीदिन साजरा केला. हा कार्यक्रम साजरा करताना भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी येथील करुणा गावडे, रेखा गावडे, सपना परब, गीता जाधव, क्रांती धनवे, सीमा तेजम, प्राची सांगोलकर, उमा नार्वेकर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व परिचारिका म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व परिचारिकांचे, शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत, उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील मदतनीस या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी मैत्रीदिनानिमित्त गीत सादर केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित परिचारिका व मदतनीस यांना फ्रेंडशिप बेल्ट बांधले. त्यानंतर परिचारिका प्रभारी’ करुणा गावडे’ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांनी तर मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी सहा. शिक्षिका कु. विनायकी जबडे, सौ. नफिसा शेख, सौ. कविता सबलपारा, कु. अंकिता गवस’ या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सर्व परिचारिकांचे आभार मानण्याकरीता त्यांना विद्यार्थ्यांनी बनविलेले भेटकार्ड व छोटेसे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. तसेच, इयत्ता ३ च्या विद्यार्थ्यांनी मैत्रीदिनानिमित्त कुडाळ, आणव मधील आनंदाश्रय वृद्धाश्रमाला भेट दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या सहा. शिक्षिका सौ. जागृती प्रभू तेंडोलकर यांनी सर्वांचे स्वागत केले. व सर्वांना शाळेचा आश्रमाला भेट देण्यामागचा उद्देश सांगितला. तसेच, शाळेच्या सहा. शिक्षिका कु. उमा बोयान व सौ.शीला चव्हाण यांनी देखील या कार्यक्रमात सहकार्य केले. आजी – आजोबांचे मनोरंजन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैत्रीदिनाला उद्देशून नृत्य व नाटिका सादर केली. तसेच गोडपदार्थ म्हणून केकचे वाटप केले. मैत्रीचे नाते जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व आजी – आजोबांना फ्रेंडशिप बेल्ट बांधले. त्यांच्याशी विद्यार्थ्यांनी गप्पा मारल्या, त्यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच एस.एस.जी.एस.स्कूलने व शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मदत म्हणून दिलेल्या औषधे व दैनंदीन उपयोगी वस्तूंचे वृद्धाश्रमात वाटप केले गेले. अशाप्रकारे इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन मैत्रीला कोणतीही वयोमर्यादा नसते व मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचे नाते असते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तर इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी कोकणसाद लाईव्हच्या सावंतवाडी वृत्तपत्र कार्यालयाला भेट दिली. तेथे बातमी पत्रकाराकडून येण्यापासून ते वृत्तपत्रात छापून येईपर्यंत सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती मुलांना देण्यात आली. तसेच डिजिटल मिडिया कसा वापरला जातो, वाचकांसमोर येण्यापूर्वी त्यावर किती लोक काम करतात, किती मेहनत घेतली जाते व समाजाचा आरसा असलेले हे वृत्तपत्र समाजाच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाची भूमिका कशी बजावते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. हा अनुभव विद्यार्थ्यांना अतिशय समृद्ध करणारा असा होता. या कार्यक्रमाचे संयोजन समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले, तर या कार्यक्रमासाठी सहा. शिक्षिका सौ. ग्रीष्मा सावंत, सौ. अश्विनी पडवळ, सौ. प्राची साळगावकर, सौ. झरिन शेख या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका सौ. देवयानी वरसकर, पत्रकार श्री. विनायक गावस, वृत्तपत्र निवेदिका कुमारी जुईली , श्री. भगवान, श्री. आढाव व इतर सर्व कर्मचारी यांचे देखील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे वृत्तपत्र कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप बेल्ट बांधून मैत्रीदिन साजरा केला गेला.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सामाजिक बांधिलकी जपत मैत्रीदिन साजरा केला गेला. व या सर्व कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांना मैत्रीदिनच्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात मैत्रीदिन साजरा केला गेला.

प्रतिक्रिया व्यक्त करा