वैभववाडी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न वैभववाडी येथील कृषी महाविद्यालय सांगुळवाडी चे विद्यार्थी राजापूर तालुक्यातील जवळेथर या गावी जावून आपल्या ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्या जाणून घेत त्यावरील उपाय योजना आदी विषया चे सखोल विश्लेषण करून कृतिशील प्रशिक्षण घेत दोन महिने शेतकऱ्यांसोबत राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान या प्रशिक्षणासाठी कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राचार्य तेजस गायकवाड व कार्यक्रम अधिकारी प्रा.विवेक कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती माती पाणी परीक्षण, किड व रोग यांचे एकित्रत व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आणी शेतकर्यांच्या शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषीदूतांकडून करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चैतन्य शिंदे(कृषी विद्यार्थी प्रतिनिधि केंद्र जवळेथर), लहू शिंदे, संकेत गाजरे, विवेक गुंड, मयुर बोराडे , राजेंद्र मुचंडी,समाधान मोरे, अनिमेष कोडग, सौरभ साठे, सुदर्शन थोरात हे विद्यार्थी जवळेथर गावात पुढील दहा आठवडे राहून पदवी अभ्यासक्रमात घेतलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी जवळेथर गावचे सरपंच अंजली मोरे, उपसरपंच शालिनी मोरे, ग्रामसेवक अनिल भोसले, सुरेश मोरे, विवेक मोरे, आदींनी कृषीदूतांचे स्वागत केले.