भाजपच्या माध्यमातून पालकमंत्र्यांकडे मागणी…
कुडाळ
येथील ऐतिहासिक घोडेबाव ठिकाणाचा कलादालन म्हणून विकास व्हावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असलेले हे घोडेबाव ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे होते. या विश्रामगृहाची वास्तू सध्या विना वापर असून या विभागातीचा क्वचितच कार्यालयीन उपयोग केला जातो. या वास्तूच्या दुरुस्तीचा प्रश्नही प्रलंबित असून हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आहे. हे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे वेंगरला नगरपंचायतीने केलेल्या कलादालनाच्या धरतीवर या ठिकाणीही ऐतिहासिक घोडेबाव कलादालन विकसित करावे येथील पर्यटनाला आणखी चालना मिळेल व कुडाळ शहराच्या विकासालाही हातभार लागेल याकडेही प्रभाकर सावंत यांनी यादी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहेत.
शिवछत्रपतींचे ऐतिहासिक वारसा असलेले घोडेगाव ठिकाण एक ऐतिहासिक कलादालन म्हणून विकसित व्हावे असे कुडाळ वासिय काही नागरिकांची मागणी होती. हे कलादालन विकसित करून एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात द्यावे अशी मागणी ही या निवेदनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नमूद केली आहे.