*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
**मैत्री आणि मैत्र**
मैत्री होत असते ठरवून करता येत नाही आणि मैत्र सहानुभूवाने आपोआप जाणवायला लागते..
ज्ञानेश्वरांनी पसायदानात *’भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’,* असं म्हटलं आहे….
प्रेम जसं आपोआप होतं तशीच मैत्री ही होते. एकच क्षण पुरे असतो मैत्रीला.. एक सारखे स्वभाव आवडी-निवडी यातून ..कळीचं अलगद फूल व्हावं ना तशी मैत्री होत जाते आणि होते ही.. ..मात्रं एकमेकांच्या सहवासातून, विचारांतून एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी फुलतं ते मैत्र…
हे फुलणं जाणिवेच्या पल्याड असतं. “‘शब्दांवाचून कळते सारे शब्दांच्या पलीकडले ” असं घडतं. मैत्रात देणं घेणं, मागणं हे काहीच नसतं. असतं ते केवळ संवेदन…त्यासाठी जवळ असण्याची ही गरज नसते तर असते ती फक्त एकरूपत्व…/ एकरूपता
पाठीमागून पाहणा-यासही दुसऱ्याच्या मनातली खळबळ किंवा आनंद कळतो ते असतं आपापसांतील मैत्र…
कृष्णाने मैत्रभावाने जाणलं होतं.
त्यानं मागितलं नाही, यानं दिलं नाही; पण मिळालं मात्र आपोआपं….!
असं मैत्र ईश्वराशी जोडलं गेलं पाहिजे आपणा सर्वांचं….जो कोणी त्याच्याजवळ मैत्रभावाने जाईल
त्याच्याशी त्याचं मैत्र जुळतं / जुळेल. हे नक्की…
मैत्र म्हणजे एकरूपता असं साध्या सोप्या शब्दांत म्हणता येईल. ईश्वर-भक्तांचा “शब्देविण संवाद” होत असतो ते असतं मैत्र….. असं मैत्र संपूर्ण विश्वात व्हावं अशी ज्ञानेश्वरांची इच्छा ..त्यांनी व्यक्त केली होती…
विश्वातील चराचरामध्ये मैत्रभाव निर्माण झाला तर अवघं विश्व सुखानंदाच्या सरोवरात विहार करील आणि करतील…. विश्वचराचरात मैत्रभाव निर्माण करणं सहज साध्य नाही. आपण आपल्या परीनं प्रयत्न करून आपल्यासोबतच्या छोट्याशा परिघात का होईना मैत्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करावयास काय हरकत आहे ?… तर त्यासाठी आपण आपल्या मनाला समजावलं पाहिजे की हे मना..! तू कुणाचा द्वेष, ईर्षा करू नकोस ..कुणाशी वैर करू नकोस अथवा वैर धरू नकोस…
जर आपल्याला हे थोड्या प्रमाणात का होईना जमलं तर आपण “मैत्र ” या शब्दाच्या अर्थाजवळ जाऊ शकू असा विश्वास मला नक्कीच वाटतो.. मैत्रभावानेच विश्व जवळ येऊ शकते नाही का?..
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020
*संवाद मिडिया*
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————