You are currently viewing बांदा केंद्रशाळेत स्वरचित पावसाळी कविता गायन

बांदा केंद्रशाळेत स्वरचित पावसाळी कविता गायन

*बांदा*

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकास व्हावा व त्यांंच्यातील कल्पनाशक्तीचा विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेत पावसाळी स्वरचित कविता चे गायन उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.
पावसाळा हा बऱ्याच जणांचा आवडीचा ऋतू असतो पावसात भिजणे सर्वांना आवडते या पावसाविषयी आपल्या कल्पना व विचार विद्यार्थ्यांनी कवितेतून व्यक्त व्हावेत यासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ शाळेत पावसाळी कविता गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमांतर्गत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार विविध कवितांची निर्मिती केली होती आणि यांचे हावभावयुक्त गायन केले त्याचबरोबर विविध साहित्यिकांनी लिहिलेल्या पावसाळी कविता गायन सुद्धा यादिवशी विद्यार्थ्यांनी केला या उपक्रमात शाळेतील जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या कवितातून कोकणात धो धो कोसळणारा पाऊस, रिमझिम पाऊस ऊन,पावसाने निसर्गात होणारे बदल ,पावसाने होणारा प्राणी मात्रांना होणारा आनंद अशा वेगवेगळ्या भावना विद्यार्थ्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केल्या .
यावेळी स्वरचित कतिता सादर‌ केलेल्या विद्यार्थ्यांना उपशिक्षक शांताराम असनकर यांनी भेटवस्तू देऊन सन्मानित केले. कविता गायन करताना विद्यार्थ्यांना संगीत साथ‌ रंगनाथ परब ,प्रदिप सावंत व सपना गायकवाड यांनी दिली . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालन उपशिक्षक जे.डी.पाटील‌ यांनी केले.या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी,उपशिक्षिका रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मनिषा मोरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शालेय मंत्रीमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा