गणेश चतुर्थी साठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नियोजन करावे !
प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव
गणपती उत्सवांचे पडघम वाजू लागले आहेत. गणेशमूर्तीकार मूर्ती घडविण्यात मग्न झाले आहेत .पुन्हा एकदा गणेश मूर्तीच्या किंमती वाढल्या आहेत. तर गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत. रेल्वे आरक्षण किती तरी दिवस अगोदरच बुकिंग झाल्याने पुन्हा एकदा लालपरीकडे प्रवासी वळताना दिसून येत आहे. तिथंही आरक्षण बुकिंग झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मुंबई आणि उपनगरातून काही गाड्यांचे बुकिंग करून मंडळे गावोगावी एस टी सोडण्यासाठी प्रयत्नशील असून त्याचेही आरक्षण करण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल, परळ , कुर्ला, भांडुप, ठाणे या आगारातून प्रतिवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत असताना प्रवाशांना यक्षप्रश्न भेडसावतो आहे की, गेल्या वर्षी एस टी चा जो संप झाला त्यात कित्येक गाड्या नादुरुस्त अवस्थेत आगारातून ये जा करीत असून त्यातील अस्वच्छतेने भरलेल्या गाड्या प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत. त्यातीलच कित्येक गाड्यांची मलमपट्टी करून प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्याने मध्येचं जाऊन बंद पडतात. हे विदारक चित्र आजवर अनुभवले असून हा अनुभव प्रवाशांच्या गाठीशी असल्याने बुकिंग केलेल्या प्रवाशांनी आताच धसका घेतला आहे. एका बाजूला महिला प्रवासी, जेष्ठ नागरिक यांच्यावर सवलतीची खैरात करताना एस टी च्या दर्जात सुधारणा करण्यात आली नसल्याने सुखकर प्रवास कसा होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. लालपरीचा प्रवास सामान्य माणसाला बहुजन हिताय बहुजन सुखाय या एस टीच्या ब्रिदवाक्याप्रमाणे व्हावा यासाठी प्रत्येक आगार व्यवस्थापक व विभागीय कार्यालयाने यांनी नियोजन करावे. दरम्यान कित्येक आगारांना दहा दहा वर्षे नवीन गाड्या देण्यात आल्या नसल्याचे सांगितले जाते आहे. या निमित्ताने त्या द्यावात ! अलिकडे काही आगारात चालक वाहक भरती करण्यात आली आहे. त्यात काही आगरात चालक वाहक यांना दुहेरी सेवा द्यावी लागत असल्याचे वाहकाने सांगितले आहे. विशेषतः अशी नव्याने भरती प्रक्रिया करण्यात आलेल्याना सेवा देणे बंधनकारक करण्यात आले असून याचा फटका प्रवाशांना बसू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. पुरेशी विश्रांती जर वाहतूक सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळणार नसेल तर अशाप्रकारे वाहतूक व्यवस्था राबविण्यात आल्यास गणपतीला गावी जाणाऱा चाकरमानी वेळेत गावी कसा पोचू शकेल ? याचा खुलासा एस टी विभागीय कार्यालयाने करावा अशी विचारणा प्रवासी वर्गाकडून होत आहे.
– प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव
+91 99692 52991
*संवाद मिडिया*
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————