*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*दोन ध्रुवांचे अंतर ….*
दहावी नंतर शिकायला म्हणून मी धुळ्याला मामांकडे गेले.
धुळ्याच्या सुरूवातीला कमलाबाई व नंतर जीजामाता
मुलींच्या हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला.अवघे १४/१५ वर्षाचे
वय. काही कळत नव्हते.मामा आम्हा बच्चे कंपनीला घेऊन
एखादा धार्मिक सिनेमा ते आम्हाला दाखवत असत.(हसू नका
पण त्या सिनेमातल्या सर्व नट्या मला सारख्याच वाटत
असतं शिवाय नावे ही लक्षात नसतंच). मग घरी आल्यावर
ही… ती .. अशीच चर्चा होत असे. पुढे अजून सिनेमे पाहिल्यावर जरा कळू लागले. आणि त्यातील ते लग्न, ती
सुंदर आरास, सुंदर नटलेल्या वधू वरांना पाहून काही तरी
अद्भूत स्वप्नमय पाहिल्याचे वाटू लागले. नंतर ती वधूची
विदाई, ती रडारड, सुंदर सजवलेला मेणा, त्याचे ते झिरझिरीत
पडदे, मखमली तक्के उशा गाद्या व जमिनीवर ठेवलेल्या त्या
मेण्यात वधूचे घुंघट घेतलेले ते रूपमनोहर रूप पाहून तर
अप्सराच अवतरल्याचा भास होई.
आमच्या सारख्या अर्धवट वयातल्या मुला मुलींना त्या अनोख्या स्वप्नमय अशा मेण्याकडे पाहून , बाप रे “ बिदाई
अशी इतकी सुंदर असते काय? अशी नवलाई वाटत असे.
खेड्यातल्या आमच्या सारख्या वेड्या बावळ्या मुलींसाठी
ते एक वेगळेच जग आहे, प्रत्यक्ष जीवनात त्याचा काही संबंध
नाही अशी आमची ठाम भावना होती नि ती खरीच होती.
ती सुंदर दृश्ये मात्र मनातून कधी जात नसतात हे ही खरेच
होते. नंतर मग या दृश्यांची जागा सजवलेल्या कार ने घेतली
व स्वप्नातही कार चा कधी विचार न केलेल्या प्रेक्षकांना ते
आणखी अद्भूत स्वप्नमय वाटत असे.
असो,
हे अशा साठी सांगितले की, भले खेड्यातील मुलींची लग्ने
साध्या पद्धतीने होत असतील पण तिने ती वधू हळूवार पणे
मेण्यात बसतांना, ते चिकाचे पडदे लावतांना पाहिलेली असे व
मनाच्या कोपऱ्यात हा मेणा कुठेतरी लपलेला असे.तिला हे
प्रत्यक्षात कधी ही शक्य नाही हे ही माहित असे.
पुढे एफ वाय एस वाय ला भरपूर सिनेमे कळत्या वयात पाहिले. व तो परिणाम पुसला न जाता वाढत गेला.श्रीमंत
राजेरजवाडे सोडले तर अशी लग्ने फक्त सिनेमातच होत
असत. लोक पहात व ये अपनी बस की बात नही समजून
विसरून जात जे आम्ही ही केले.
हा मेणा, आताच्या भाषेत पालकी पाहिलेली होती . ती मनात
एका कोपऱ्यात लपून होती, आहे. कारण मनी वसे ते स्वप्नी
दिसे म्हणतात ते खरे. अहो, अजूनही मी भन्नाट वेगाने ब्रेक न लावता सायकल चालवल्याची स्वप्ने मला पडतात. कारण
सायकल शिकतांना मी खूप वेळा खड्ड्यात आदळले होते.
त्या वयात काही वाटत नसे त्याचे. विटेने कंबर शेकली की
झाले, पुन्हा उड्या मारायला तयार!
आता हा मेणा मनात असतांना…
कापडण्या सारख्या माझ्या खेडे गावात दुसरी पालखी,
आमच्याकडे डोली म्हणतात त्याला, पाहिली ती गावातल्या
आजूबाजूच्या लोकांच्या मौतीची! किती विरोधाभास हो..!
कुठे ती फुलांनी सजलेली मेहेंदी भरल्या हाताच्या नववधूची
पालकी, मेणा तर कुठे ही अस्थिपंजर झालेल्या वृद्धांची डोली!
दोन्ही ही जीवनाची कठोर सत्ये आहेत, एक आहे पदार्पणाचे
तर दुसरे आहे निर्गमन अर्थात निर्वाणाचे! दोन्ही ही नाकारून
चालत नाही. मुंडावळ्या बांधाव्याच लागतात व एवढे सुंदर
शरीर जराजर्जर होऊन त्याला ही कामट्यांच्या डोलीतून , वय
झाले म्हणून,(तुम्ही चाललात,छान,)बॅंडबाजाच्या भजनाच्या
तालासुरात तुमची पाठवणी करतो म्हणून समाज दु:ख न करता पाठवणी करतो हे कठोर सत्य ही त्यावेळी काही कळत
नसले तरी भीतीयुक्त अंत:करणाने आईमागे दडत ह्याची डोळा
ह्याची देही पाहिले आहे.
कशी तुलना होऊ शकते दोघींची? छे! एक स्वप्नमय नव
तारूण्य आहे तर एकातला जीवनरस व जीवनेच्छाच संपली
आहे. दोन ध्रूवांचे अंतर आहे त्यात! त्यामुळे हा विषय आला
तेव्हा तर मी खूप नर्व्हस झाले होते.
एक सुंदर टवटवीत रसरशीत गुलाब आहे तर एकाचे निर्माल्य
झाले आहे. पण जीवनाच्या या दोन्ही अवस्था सत्य तर
आहेतच ना? मग सामोरे जायला काय हरकत आहे असा मी
विचार केला. शेवटचे दृश्य किती ही त्रासदायक असले तरी
फेस करावेच लागते ना?
लोक पोहोचवतात व विसरून कामाला लागतात कारण,
शो मस्ट गो ॲान…
काळ थांबत नाही, तुम्हाला चालावेच लागते मंडळी..!
धन्यवाद …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ७ जुलै.२०२३
वेळ : रात्री ११/२४
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————