सावंतवाडी :
सावंतवाडी भटवाडी येथील ओम साई ट्रॅव्हल्स चे मालक रमेश उर्फ बाळा लक्ष्मण साळगावकर (वय ७२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साई ट्रॅव्हल्स सुरू करून मुंबई, गोवा, पुणे आधी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या माध्यमातून प्रवाशांना सुख सोयी उपलब्ध करून देण्यात त्यांचा वाटा होता. त्यांचा मनमिळावू शांत स्वभाव होता. रमेश उर्फ बाळा लक्ष्मण साळगावकर ज्येष्ठ शिवसैनिक काम करत होते.
सावंतवाडी शहरात पहिल्या शिवसेना शाखेच्या शुभारंभ पासून तयार आहेत ते अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजा शिवाजी चौक मित्र मंडळची स्थापना केली होती. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन बहिणी, भाचे असा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे ते बंधू होत.