मराठा महासंघाची मागणी; अन्यथा आंदोलन करणार, जिल्हा परिषदेला इशारा…
ओरोस
जिल्ह्यात शिक्षक भरती करण्यापूर्वी बिंदूनामावलीत दुरुस्त करून पुढील प्रक्रिया राबवा, अन्यथा आंदोलन उभारले जाईल,असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे. आंतरजिल्हा बदलीने तसेच जिल्हा परिषद व महापालिकांच्या बिंदू नामावलीच्या रोस्टरमध्ये घोळ झाल्याचा त्यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.